अहमदाबाद (वृत्तसंस्था) : आयपीएलच्या यंदाच्या हंगामाचा अंतिम सामना रविवार २९ मे रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात असल्याने यंदा आयपीएलची सांगता दणक्यात होणार आहे. या सामन्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहणार असल्याचे समजते. सुरक्षेसाठी स्टेडियम परिसरात तब्बल ६ हजार पोलीस तैनात करण्यात येणार आहेत.
या सामन्यापूर्वी सांगता कार्यक्रम होणार असून हा सामना इतर सामन्यांच्या तुलनेत अर्धा तास उशीरा सुरू होणार आहे. म्हणजेच रात्री ८ वाजता अंतिम सामना होणार आहे. साडेसात वाजता नाणेफेक होईल.
मिळालेल्या माहितीनुसार, आयपीएलच्या अंतिम सामन्यापूर्वी समारोप कार्यक्रम आयोजीत करण्यात येणार आहे. यामध्ये बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांचा समावेश असेल. आयपीएलचा क्लोजिंग समारोप २९ मे रोजी सायंकाळी साडेसहा वाजता सुरू होणार आहे. हा कार्यक्रम ५० मिनिटांपर्यंत रंगणार आहे. त्यानंतर साडेसात वाजता नाणेफेक होणार आहे. तर आठ वाजता सामन्याला सुरुवात होईल.
कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून आयपीएलच्या सामन्यांवर निर्बंध होते. पण यंदा कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात आल्याने आयपीलच्या सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये प्रेक्षकांना परवानगी दिली होती. आता आयपीएल २०२२ स्पर्धा अंतिम टप्प्यात असून रविवारी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये अंतिम सामना रंगणार आहे. या सामन्याची जंगी तयारी करण्यात आली आहे.
यावेळी ६ हजार पोलीस स्टेडियम परिसरात तैनात करण्यात येणार आहेत. तसेच राजकारण, चित्रपट अशा विविध क्षेत्रातील दिग्गज यावेळी उपस्थित राहणार असल्याचे समजते. आयपीएलचा क्लोजिंग समारोप २९ मे रोजी सायंकाळी साडेसहा वाजता सुरू होणार आहे. यंदा कोरोना नियंत्रणात असल्याने आयपीएलची सांगता दणक्यात होणार आहे.