जन्मानंतर तासाभरातच बाळावर ओपन हार्ट सर्जरी

मुंबई (प्रतिनिधी) : एका अत्यंत दुर्मिळ प्रसंगी जन्मजात हृदयदोष (हायपोप्लास्टिक लेफ्ट हार्ट सिंड्रोम) असलेल्या एका नवजात बालिकेवर तिच्या जन्मानंतर अवघ्या तासाभरातच एक ओपन-हार्ट सर्जरी (नॉरवुड ऑपरेशन) करण्यात आली. बाळाला जीवनदान देणारी ही शस्त्रक्रिया सहा तासांहून अधिक काळ चालली. फीटल एको चाचणीमध्ये बाळामध्ये असलेला जन्मजात हृदयदोष प्राणघातक असल्याचे दिसून आले होते व बाळाला वाचविण्यासाठी आपत्कालीन शस्त्रक्रियात्मक हस्तक्षेप गरजेचा होता, त्यामुळे बाळावर जन्मल्या जन्मल्या शस्त्रक्रिया करावी लागली.


ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया मुलुंड येथील फोर्टिस हॉस्पिटलचे कन्सल्टन्ट पीडिअॅट्रिक कार्डिओथोरॅसिस सर्जन डॉ. धनंजय मालणकर यांनी पीडिअॅट्रिक कार्डिओलॉजिस्ट डॉ. स्वाती गारेकर आणि डॉ. श्याम ढाके, पीडिअॅट्रिक कार्डिअॅक अॅनेस्थेशियोलॉजिस्ट-इन्टेसिव्हिस्ट डॉ. शिवाजी माळी अशा खास बाळांसाठीच्या हृदयरोगतज्ज्ञांचा समावेश असलेल्या आपल्या टीमच्या साथीने ही शस्त्रक्रिया पार पाडली.


सोलापूरला राहणाऱ्या प्रिया घोरपडे यांनी आपल्या गर्भावस्थेच्या ३६व्या आठवड्यामध्ये करून घेतलेल्या फीटल एको चाचणीमध्ये त्यांच्या पोटातील बाळामध्ये एक दुर्मिळ हृदयदोष असल्याचे दिसून आले. त्यानंतर घोरपडे कुटुंबाने प्रिया यांच्या प्रसूतीसाठी मुलुंड येथील फोर्टिस हॉस्पिटलला भेट दिली. मुलुंडच्या फोर्टिस हॉस्पिटलमध्ये पुन्हा एकदा घेतल्या गेलेल्या फीटल एकोकार्डिओग्राममधून हायपोप्लास्टिक लेफ्ट हार्ट सिंड्रोम (एचएलएचएस) या आजाराच्या निदानाला पुष्टी मिळली. या हृदयदोषामध्ये हृदयाची डावी बाजू योग्य प्रकारे आकाराला आलेली नसते व त्यामुळे हृदयाला सुरळीतपणे रक्तपुरवठा होण्यामध्ये अडथळा येतो.


एचएलएचएससह जन्माला आलेल्या बाळांच्या हृदयाच्या वरच्या दोन कप्प्यांमध्ये सर्वसाधारणपणे एक छिद्र (एएसडी) असते, जे जगण्यासाठी आवश्यक असते. एचएलएचएसचे अत्यंत दुर्मिळ उदाहरण असलेल्या या प्रकरणामध्ये एएचडी अस्तित्वात नव्हते. (अॅट्रियल सेप्टम अक्षत होते) यामुळे फुफ्फुसांकडून येणारे ऑक्सिजनयुक्त रक्त हृदयामध्ये आणि त्यानंतर शरीरात प्रवाहित होणे अशक्य झाले होते. यामुळे या प्रकरणातील जोखीम आणि गुंतागुंत वाढली होती आणि प्रसूतीनंतर बाळाचे प्राण वाचावेत, यासाठी अत्यंत तातडीच्या शस्त्रक्रियेचा निर्णय घेण्यात आला. घोरपडे यांची तपासणी झाल्यानंतर त्यांना प्रसूतीवेदना वेळेआधीच सुरू झाल्याचे आढळून आले व त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेण्यात आले. पुढच्याच दिवशी कन्सल्टन्ट-ऑब्स्टेट्रिशियन आणि गायनेकोलॉजिस्ट डॉ. अतुल गणात्रा यांनी नियोजित वेळी सी-सेक्शन शस्त्रक्रिया पार पाडले. बाळ जन्माला आल्याआल्या एक स्क्रिनिंग एको चाचणी पार पाडण्यात आली त्यातून अॅट्रियल सेप्टम अक्षत असणाऱ्या एचएलएचएसचे निदान पक्के झाले.

Comments
Add Comment

महापालिका शाळांमधील मुलांचे व्याकरण होणार अधिक मजबूत

इयत्ता पाचवी ते आठवीच्या मुलांना देणार व्याकरणाची पुस्तके मुंबई (खास प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांचे भाषेच्या

मुंबई–वाढवण प्रवासाला नवे पंख; कसा असेल वाढवण बंदराशी जोडणारा उन्नत पूल?

मुंबई : मुंबई ते वाढवण बंदरापर्यंतचा प्रवास आता अधिक वेगवान आणि सुलभ होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दक्षिण

पद्मभूषण सन्मानित धर्मेंद्र यांना शासकीय अंत्यसंस्कार नाहीत; खरे कारण समोर

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले असून, त्यांच्यावर मुंबईतील विलेपार्ले

Amitabha bachchan Dharmendra : 'अन् निःशब्द शांतता...' धर्मेंद्र यांच्या अंतिम निरोपानंतर 'जय'ची हृदयस्पर्शी पोस्ट व्हायरल

मुंबई : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांच्या निधनाने सिनेसृष्टीतील एका तेजस्वी पर्वाचा अंत झाला आहे.

उत्तन - विरार सी लिंकचा विस्तार वाढवण बंदरापर्यंत

- एमएमआरमधील प्रवासाला येणार वेग मुंबई : महाराष्ट्र शासनाने उत्तन–विरार सी लिंक आणि तिचा वाढवण बंदरापर्यंत

कस्तुरबा रुग्णालयात उभारणार १३० केव्हीचा सौर ऊर्जा प्रकल्प

दरवर्षी ११ लाख रुपयांची होणार बचत मुंबई : मुंबई महापालिकेच्यावतीने ऊर्जा बचतीच्या दृष्टिकोनातून पाऊल टाकून