आयबीएच्या अॅथलीट्स समिती अध्यक्षपदी लव्हलिना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकणारी भारतीय बॉक्सर लव्हलिना बोरगोहेनची इंटरनॅशनल बॉक्सिंग असोसिएशनच्या अॅथलीट समितीच्या प्रमुखपदी निवड झाली आहे. इंटरनॅशनल बॉक्सिंग असोसिएशनतर्फे सांगण्यात आले की, लोव्हलिनाला सर्वाधिक मते मिळाली आहेत.


महिलांच्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत खेळाडू समितीचे प्रमुख आणि संचालक मंडळासाठी मतदान झाले. नुकतेच हे मतदान पार पडले. शिव थापा यांचीही क्रीडापटू समितीत निवड झाली आहे. त्यांची निवड २०२१ च्या पुरुषांच्या जागतिक चॅम्पियनशिप दरम्यान झाली.


निवड झाल्यानंतर लव्हलिना म्हणाली, 'माझा सन्मान आहे. मला समिती सदस्य होण्याची आशा होती, पण मी अध्यक्ष होईन याची कल्पनाही नव्हती. यामुळे मला भारतीय बॉक्सिंग, विशेषतः महिला बॉक्सिंगला प्रोत्साहन देण्यासाठी मदत होईल. बॉक्सिंगला प्रोत्साहन देण्याची ही माझ्यासाठी मोठी संधी असल्याचेही ती म्हणाली. सर्वप्रथम, मी सदस्य मंडळ आणि जगातील बॉक्सर्सचा सल्ला घेण्याचे ठरवले आहे.


या कामगिरीबद्दल केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी अभिनंदन केले आहे. ठाकूर म्हणाले, 'ही मोठी जबाबदारी आहे. मला आशा आहे की तुम्ही दोघेही तुमचे कर्तव्य पार पाडाल.

Comments
Add Comment

विराटचा दोन डावातील सलग ११ शतकांचा विक्रम

मुंबई  :  विराट कोहलीने त्याचे ५३वे एकदिवसीय शतक झळकावले आहे. रायपूरमध्ये सुरू असलेल्या दक्षिण

आयसीसी क्रमवारीत कोहलीची विराट भरारी

मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेदरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने नुकतीच

दक्षिण आफ्रिकेच्या टी - २० मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर

फिटनेसवर ठरणार शुभमन गिलचा निर्णय नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेच्या टी-२० मालिकेसाठी आता भारताचा संघ जाहीर

एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने साधली बरोबरी

रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना दक्षिण

रायपूर ODI : द. आफ्रिकेपुढे ३५९ धावांचे लक्ष्य

रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना

रायपूरमध्ये होणार भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना

रायपूर: दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा रांचीतील पहिला सामना जिंकून भारतीय संघाने एकदिवसीय मालिकेची दमदार सुरुवात