कंत्राटदार करणार शिवाजी पार्कची देखभाल!

मुंबई (प्रतिनिधी) : दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्कच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी पहिल्यांदाच पालिकेने कंत्राटदार नेमला आहे. मैदानावर असलेली धूळ रोखण्यासाठी, पाणी मारण्यासाठी आणि मैदानातील हरितपट्टा राखण्यासाठी कंत्राटदाराची नेमणूक केली आहे.


दरम्यान मैदानातील धुळीमुळे परिसरातील स्थानिकांना त्रास होत होता. पावसाळ्यात मैदानात पाणी साचल्यामुळे खेळता येत नव्हते. या सगळ्याचा विचार करून पालिकेने मैदानाची देखभाल करण्यासाठी कंत्राटदाराची नियुक्ती केली आहे. यासाठी पालिकेने निविदा मागवल्या होत्या. यात कपूर ट्रेडिंग ही कंपनी पात्र ठरली आहे. अंदाजित रकमेपेक्षा उणे २१ टक्के दर या कंपनीने आकारला आहे, तर रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमातून मैदान धूळमुक्त केले जाणार आहे. या मैदानात रेनवॉटरसह पर्जन्य जलवाहिनी टाकण्यात आली आहे.


गवताळ भाग तयार करण्यात आल्याने, येत्या एप्रिल आणि मेपर्यंत संपूर्ण शिवाजी पार्क मैदानातील गवत चांगल्या प्रकारे वाढले जाणार आहे. पार्काचे परिरक्षण आणि देखभाल करण्यासाठी या कंपनीला तीन वर्षांकरता हे कंत्राट देण्यात आले असून १२ माळी आणि १२ सफाई कामगार काम करणार आहेत. या कंत्राटात मैदानाला पाणी मारणे, पंप सुरू करणे तसेच मैदान परिसराची स्वच्छता राखण्यासह विविध कार्यक्रम व सभांच्या आयोजनानंतर तेथे स्वच्छता राखण्याची जबाबदारी संबंधित कंपनीवर असेल.

Comments
Add Comment

जनगणना २०२७च्या पूर्वचाचणीसाठी चेंबूरमध्ये १३५ प्रगणक, २२ पर्यवेक्षकांची नेमणूक

मुंबई (खास प्रतिनिधी) - जनगणनेच्या तयारीचा एक भाग म्हणून, मुंबई महानगरपालिकेच्या एम पश्चिम विभागात पूर्वचाचणी

राणीबागेत बोन्साय आणि ओरिगामी कला प्रदर्शन

मुंबई (खास प्रतिनिधी) : निसर्गसौंदर्य आणि सर्जनशीलतेचा अनोखा मिलाफ नोव्हेंबरच्या अखेरीस मुंबईकरांना अनुभवायला

मंडाळे आशियातील सर्वात मोठा आणि आधुनिक मेट्रो डेपो !

मुंबई : मुंबईच्या मेट्रो वाहतूक यंत्रणेत नवा अध्याय सुरू होत आहे. डी. एन. नगर ते मंडाळे मेट्रो लाईन २ बी साठी मंडाळे

“जो जीता वही सिकंदर” शरद पवारांच्या बिनबुडाच्या आरोपानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचा पलटवार!

मुंबई : बिहार विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होताच राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाल्याचं चित्र समोर

मुंबई महापालिकेच्या १० कंत्राटी समुदाय संघटकांनी दिला राजीनामा

नव्याने कंत्राटी भरती करण्याऐवजी ५५ संघटकांना पुन्हा ११ महिन्यांची मुदत दिली वाढवून मुंबई (खास

भांडुपमध्ये मनसे गळाला लावणार तीन प्रभाग

खासदार कन्येला कुठल्या प्रभागात स्थान भाजपाच्या गडात की मनसेच्या वाट्याला जाणाऱ्या प्रभागात मुंबई (सचिन