वसई-विरार महानगरपालिकेचे ७२० कोटींचे नुकसान

नालासोपारा (वार्ताहर) : शहरातील मोकळ्या जागांवर विकासकांकडून अकृषिक कर आकारणी करण्याची तरतूद असतानाही पालिकेने अद्याप हा कर लावला नाही. त्यामुळे पालिकेला दर वर्षी ६० कोटी रुपयांप्रमाणे ७२० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे याचा आर्थिक फटका त्या मोकळ्या जागेवर तयार होणाऱ्या गृहनिर्माण संकुलातील रहिवाशांना बसतो आहे. केवळ बड्या विकासकांना फायदा व्हावा, म्हणून हा कर लावला जात नसल्याचा आरोप भाजपने केला आहे.


वसई-विरार शहरातील मोकळ्या जागांवर अकृषिक करांची (एनए टॅक्स) आकारणी करायची असते. राज्य शासनानेदेखील तसे निर्देश दिले होते आणि त्यानुसार शासननिर्णय काढण्यात आला होता. सर्व महापालिकांमध्ये अशा अकृषिक कराची आकारणी केली जाते. मात्र वसई-विरार महापालिकेत अद्याप मोकळ्या जागेवरील कर आकारणी केलेली नाही. वसई-विरार शहरातील अनेक मोकळय़ा जागा या बड्या विकासकांच्या ताब्यात आहेत. त्यांना फायदा व्हावा म्हणून अकृषिक कर आकारणी करण्यात येत नसल्याचा आरोप भाजपचे माजी नगरसेवक किरण भोईर यांनी केला आहे.


शहरात एचडीआयएल, दिवाण यासारख्या बड्या विकासकांनी जागा ताब्यात ठेवल्या आहेत. एव्हरशाइन सिटी, वसंत नागरी, दिवाण, आचोळे, गोखिवरे, मधुबन, सनसिटी, बोळिंज, वालीव, नवघर, वसई अशा अनेक ठिकाणच्या मोकळ्या जागा विकासकांच्या ताब्यात आहेत. काही विकासकांनी या जागेचा कृषिक परवाना खूप आधीच काढला आहे; परंतु तेथे परिसर विकसित झाल्यानंतर विकासक आपल्या प्रकल्पाचे काम करतात. मागील १५ ते २० वर्षांपासून या जागा आहेत. त्यामुळे त्यांच्या फायद्यासाठी असा कर आकारला जात नसल्याचा आरोपही भाजपने केला आहे.


आयुक्तांकडे प्रशासकीय अधिकार आहे. त्यामुळे महासभेच्या निर्णयाची वाट न बघता आयुक्तांनी तत्काळ या अकृषिक कराची अंमलबजावणी करावी, अशी मागणी भोईर यांनी आयुक्तांकडे केली आहे. २००९ साली महापालिका स्थापन झाली. पालिकेने तेव्हाच कर लावला असता, तर प्रतिवर्षी ६० कोटी याप्रमाणे पालिकेने ७२० कोटी रुपयांच्या उत्पन्नाला मुकावे लागले नसते, असेही भोईर यांनी सांगितले.

Comments
Add Comment

पाण्याच्या टाकीत मानवी हाडांचा सापळा

वसईच्या माणिकपूर गावातील घटना वसई : वसईच्या माणिकपूर येथील एका चाळीच्या रिकाम्या पाण्याच्या टाकीत पुरुषाच्या

अर्थसंकल्पातून पालघरसाठी विकासाची ‘महा-भेट’ : खासदार डॉ. सवरा

पालघर : केंद्रीय अर्थसंकल्पात पालघर जिल्ह्यासाठी विकासाचे नवीन दरवाजे उघडले आहेत. या बजेटमध्ये पालघरच्या

कोट्यवधींचा शिक्षण कर वसूल; शाळा हस्तांतरण मात्र रखडलेलेच

महापालिकेत शिक्षण समिती व सभापती नसण्याची परंपरा कायम राहणार गणेश पाटील विरार : महापालिकेची स्थापना होऊन १६

मुंबई-बडोदरा आणि भिवंडी-मनोर मार्गांचे काम युद्धपातळीवर

रस्त्यांच्या जाळ्यांमुळे विकासाची कोंडी फुटणार वसंत भोईर वाडा : गेल्या अनेक वर्षांपासून दुरवस्थेचा सामना

महापौरांना ७५ हजार रुपये वाहन प्रतिपूर्ती भत्ता

उपमहापौरांना ६५ हजार, तर विरोधी पक्षनेत्याला ५० हजार विरार : वसई-विरार महानगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांना

वसई-विरार महापालिकेत महापौर पदासाठी ७ अर्ज

उपमहापौर पदासाठी ५ अर्ज विरार : वसई-विरार महानगरपालिकेच्या महापौर, उपमहापौर पदासाठी शुक्रवारी अर्ज दाखल