मुंबई : मंत्री अनिल परब यांच्या घरी आज सकाळी ईडीने छापे टाकले. तसेच अंधेरी पश्चिम येथील विधानसभेचे शिवसेना संघटक आणि अनिल परब यांचे निकटवर्तीय संजय कदम यांच्या घरीही ईडीने छापा टाकला आहे.
संजय कदमयांच्या घरी सकाळपासून ईडीचे अधिकारी पोहोचले असून त्या ठिकाणी शिवसैनिकांनी गर्दी केली आहे.
दरम्यान याअगोदरही अनिल परब यांच्या जवळच्या व्यक्तींच्या घरी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापे टाकले होते. त्यावेळी कदम यांच्या घरी त्यांना मोठा मुद्देमाल हाती लागला होता. त्यानंतर आता दोन महिन्यांनी ईडीने छापा टाकला आहे.