भिवंडी, वाडा-मनोर महामार्गावरील अपघातात तिघांचा मृत्यू

वाडा (वार्ताहर) : वाडा तालुक्यातील नेहरोली व कंचाडजवळ बुधवारी झालेल्या दोन अपघातांत तिघांना जीव गमवावा लागला. भिवंडी-वाडा मार्गावर नेहरोली येथे रस्ता दुरुस्तीचे काम चालू आहे. तिथे एकेरी वाहतूक सुरू आहे. यावेळी विरुद्ध मार्गाने कुडूसहून येणाऱ्या ट्रकने एका दुचाकीस्वाराला धडक दिली. यामध्ये दुचाकीचालक मनीष परदेशी (वय,३०) हे गंभीर जखमी झाले. त्यांना वाडा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाला.


दुसरा अपघात वाडा-मनोर महामार्गावरील कंचाड हद्दीतील फणसपाडा येथे घडला. मनोरच्या दिशेकडून कंचाडकडे येत असलेल्या दुचाकीवरील दोघांचा अपघात झाला. अपघाताच्या ठिकाणी रस्तादुरुस्तीचे काम चालू आहे. याठिकाणी सावधानतेचे फलक, बॅरेकेट्स लावलेले नसल्याने दोघे तरुण रस्त्यावर पडल्यानंतर त्यांच्या अंगावरून ट्रक गेल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या घटनेत योगेश सुभाष गोवारी (वय, २३), किरण यशवंत बाने (वय, २०) या दोघांचा मृत्यू झाला. अपघातास जबाबदार असणाऱ्या कंत्राटदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे.
Comments
Add Comment

पेटीएम ट्रॅव्हलचा ‘महा कार्निव्हल सेल’

विमान आणि बस प्रवासावर २० % पर्यंत सणासुदीची सवलत मुंबई:पेटीएमने ‘महा कार्निव्हल सेल’ची घोषणा केली आहे. या

कल्याणमध्ये मराठीची सक्ती आहे का, विचारत महिलेची अरेरावी

१५ ऑक्टोबरपर्यंत मराठी न आल्यास दुकानातून खरेदी न करण्याचे आवाहन कल्याण : कल्याण, प. येथील 'पटेल आर मार्ट'मध्ये

मुंबई मेट्रो-३ च्या वेळापत्रकात १५ सप्टेंबरपासून बदल

मुंबई : मुंबई मेट्रो-३ या शहरातील अॅक्वा लाईनने नुकतेच सुधारित सेवा वेळापत्रक जाहीर केले आहे. आज सोमवारपासून

दिवाळीनिमित्त जादा बसगाड्या सोडणार

मुंबई : दसरा दिवाळी सणानिमित्त प्रवाशांची गर्दी लक्षात घेता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे राज्यभरात

मुसळधार पावसाचा धुमाकूळ, मराठवाड्यात हजारो हेक्टर शेती गेली वाहून

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात सह संपूर्ण मराठवाड्याला पावसाने झोडपून काढले. मराठवाड्यातील

डेहराडूनमध्ये ढगफुटी, दोन बेपत्ता; बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू

डेहराडून: उत्तराखंडची राजधानी डेहराडूनमध्ये सोमवारी रात्री झालेल्या ढगफुटीमुळे हाहाकार उडाला आहे. शहराच्या