Monday, January 20, 2025
Homeअध्यात्मजीवनसंगीत ही कला आलीच पाहिजे

जीवनसंगीत ही कला आलीच पाहिजे

संसार करत असताना जीवनसंगीत ही कला आलीच पाहिजे. संगीतात जसे ते सर्व स्वर चांगल्या रीतीने हाताळता आले पाहिजेत. तसे जीवनसंगीतात सर्व स्वर चांगल्या रीतीने हाताळता आले पाहिजेत. यातला कुठला स्वर श्रेष्ठ व कुठला स्वर कनिष्ठ असे नाही. परमेश्वरी व्यवस्था इतकी परफेक्ट आहे की, एक वजा केले तरी बाकी शून्य. जग नाही, तर काही उरणार नाही. तुम्ही जगाचा एक भाग आहात तेव्हा जग नाहीतर काय अर्थ आहे. कुटुंबात आई-वडील, बायको-मुले, जावई-सूना, नातवंडे हे सर्व पाहिजेत. हे सर्व कुटुंबाचे भाग आहेत. तेच नसेल, तर जीवनाला काही अर्थ नाही. ब्रम्हचारी संन्यासी साधू आहे, तर त्याच्या जीवनाला काही अर्थ नाही. जीवनविद्या असे सांगते की, कुटुंब हा एक अत्यंत महत्वाचा स्वर आहे. हा स्वर जर नीट हाताळता आला नाही, तर तुमचे जीवन बरबाद होईल. जगाला जितके महत्त्व आहे, तितकेच महत्त्व कुटुंबालाही आहे. जीवनविद्या सांगते, प्रथम कुटुंबापासून सुरवात करा. जगाचा संबंध नंतर येतो. अर्थात आई-वडील, बायको-मुले हीसुद्धा आपल्या जगात येतात. कुटुंब हा स्वर अत्यंत महत्त्वाचा आहे. मानवी शरीर किती महत्त्वाचे आहे. इतके महत्त्वाचे आहे की, शरीर साक्षात परमेश्वर हा सिद्धांतच जीवनविद्येने मांडला. शरीराचे महत्त्व वर्णन करायला शब्द अपुरे पडतील. शरीराचे महत्त्व ठाऊक नाही. त्यामुळे परमार्थ बिघडतो व संसारही बिघडतो.

त्यानंतर इंद्रिये ही आपल्याला मिळालेले अलंकार आहेत. बायका आपल्या अंगावर अलंकार घालतात, त्याप्रमाणे परमेश्वराने आपल्या शरीरावर लेणी चढवली ती म्हणजे इंद्रिये. बहिर्मन किती महत्त्वाचे आहे की, बहिर्मनाने अंतर्मनाचा पॅटर्न बदलता येतो. बहिर्मन कसे आहे यावर अंतर्मन कसे असेल? हे ठरत असते. अंतर्मन किती महत्त्वाचे आहे की, आपल्या जीवनात अनेक गोष्टी घडतात. त्यांचे मूळ अंतर्मनात असते. आपण जे विचार करतो ते घडवून आणण्याचे काम अंतर्मन करत असते. समस्या सोडविण्याचे सामर्थ्यही अंतर्मनात आहे. समस्या निर्माण करते तेही अंतर्मन व समस्या सोडविणारे ते ही अंतर्मन. वटी राहिला परमेश्वर. हा परमेश्वर किती महत्त्वाचा आहे? त्याचे वर्णन करता येणे कठीण.

तो निर्गुण व सगुण दोन्ही आहे. निर्गुणाचे वर्णन आतापर्यंत कुणालाच करता आलेले नाही अगदी वेदांनासुद्धा. “ती नेती नेती म्हणती एकू गोविंदू रे”, नेती नेती म्हणजे न इति न इति. परमेश्वराचा धावा करायला निघाले व हे ते नव्हे, हे ते नव्हे, परमेश्वर हा नव्हे अशी त्यांची अवस्था झाली. परमेश्वराचे स्वरूप असीम, अपार, अचाट, अथांग आहे. तोच परमेश्वर शरीराच्या ठिकाणी ईश्वररूपाने नांदतो. अनंतकोटी ब्रह्मांडाच्या अपेक्षेत तो परमेश्वर आहे.

– सद्गुरू वामनराव पै

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -