पालिकेकडून हेरिटेज वास्तू वर हातोडा

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेत घोटाळे वाढत चालले असून याला सर्वस्वी सत्ताधारी शिवसेना जबाबदार असल्याचा आरोप भाजप आमदार आशीष शेलार यांनी केला आहे. मुंबई महापालिकेचा नवीन घोटाळा समोर आला असून ज्यामध्ये मुंबई शहरातील राज्य सरकार नियुक्त हेरिटेज कमिटी अस्तित्वात असताना सुध्दा हेरिटेज श्रेणी ३ मधील वास्तू या हेरिटेज कमिटीच्या परवानगीविना मुंबई महापालिका आयुक्तांनी परस्पर तोडण्यासाठी परवानगी दिली आहे.


तर जगभरात हेरिटेज स्ट्रक्चर वाचविण्यासाठी प्रयत्न होत असताना शिवसेनेच्या ताब्यातील मुंबई महापालिकेत ही स्ट्रक्चर तोडण्याच्या परवानग्या बिल्डरांना जलदगतीने दिल्या जात आहेत असे शेलार म्हणाले आहे. तसेच मुंबईत श्रेणी ३ मध्ये २५० इमारती आणि स्ट्रक्चर आणि १३ परिसरांमध्ये तोडकाम करण्याची परवानगी आयुक्तानी परस्पर दिली असून ही कुणाच्या सांगण्यावरुन दिली आहे? असा सवाल ही शेलार यांनी विचारला आहे.


यातून बिल्डरांना ७० हजार कोटींचा फायदा करुन देण्यात येत असून ऐतिहासिक वास्तू तोडून बिल्डरच्या घशात ऐतिहासिक वास्तू आणि जागा घातल्या जात असल्याचा गंभीर आरोप शेलार यांनी केला असून या सगळया प्रकरणात आयुक्त कुणाच्या तरी सांगण्यावरुन ही परवानगी देत असून याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी तातडीने लक्ष घालावे अशी विनंती ही शेलार यांनी केली आहे. तर शिवसेनेचे नगरसेवक व युवा सेनेच्या एका नेत्याच्या जवळचे असलेल्या अमेय घोले नगरसेवकांनी हेरिटेज कमिटी परवानग्या देत नाही म्हणून हेरिटेज कमिटीच बरखास्त करा, अशी मागणी केली आहे.


दरम्यान मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घातले नाही तर हे महाभंयकर आहे, या विषयात मुख्यमंत्र्यांना विनंती करतोय, आयुक्तांना कायद्याची आठवण करुन देतोय अन्यथा मुबईच्या सौंदर्यात भर घालणा-या वास्तूंच्या संरक्षणासाठी आम्ही न्यायालयात जाऊ असा इशारा ही शेलार यांनी दिला आहे.

Comments
Add Comment

महापालिका शाळांमध्ये वर्षातून दोनदा भरवा विज्ञान प्रदर्शन

मुंबई : विद्यार्थ्यांमधील चिकित्सक वृत्तीला वाव देण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने आयोजित केलेले ‘विज्ञान

मुंबईतील फेरीवाला माफियाराज कायमचेच उखडून टाका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील वाढत्या फेरीवाल्यांवरील कारवाई सध्या प्रशासनाने कडक केली असली तरी या

तुमच्यापेक्षा सभागृहात गोंधळ घालण्यात आम्ही एक्सपर्ट

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेचे सर्व पक्षांच्या नगरसेवकांना सोबत घेवून चांगल्याप्रकारे कामकाज क

शाळा दत्तक धोरण रद्द करण्याची काँग्रेस आमदार पुत्राची मागणी नामंजूर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेने खासगी संस्था, स्वयंसेवी संस्था आदींना महापालिकेच्या दिलेल्या दत्तक

मासिक पाळी दरम्यान रजा योग्य की अयोग्य?

राज्य महिला आयोगाच्या वतीने चर्चासत्राचे आयोजन मुंबई : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून मासिक पाळी दरम्यान

कनिष्ठ अभियंता संवर्गातील भरतीबाबत न्यायालयात सक्षम बाजू मांडा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या नगर अभियंता विभाग अंतर्गत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/यांत्रिकी व