Tuesday, July 16, 2024
Homeमहाराष्ट्रठाणेअचूक पावसाचा अंदाज वर्तवते शेतकऱ्याचे अचूक हवामान खाते

अचूक पावसाचा अंदाज वर्तवते शेतकऱ्याचे अचूक हवामान खाते

अंदाज कधीच चुकत नाही...

अतुल जाधव

ठाणे : शेतकऱ्यांसाठी पावसाचा अंदाज हा खूप महत्वाचा असतो, पावसाच्या अंदाजावर शेतीच्या विविध कामांचे नियोजन करायचे असल्याने पावसाच्या अंदाजावरच शेतीचे गणित अवलंबून असते. मृग नक्षत्राच्या पावसावर शेतकऱ्यांची शेतीची कामे अवलंबून असतात. जसे हवामान खाते करोडो रुपयांच्या अधुनिक मशिन्समधून देखील अचूक अंदाज देत नाही, तर वर्षानुवर्ष ज्या अंदाजावर शेतकरी शेती करतो तो निसर्गाचा अंदाज मात्र कधीच खोटा होत नाही व चुकतही नाही.

शेतकरी शेती लागवडीसाठी निवडलेले उत्तम बियाणे साठवून ठेवतात व मृग नक्षत्राच्या पहिल्या पावसात पेरणी केली जाते; परंतु या नक्षत्रांत पेरणी करण्याअगोदर पाण्याचा अचूक अंदाज निसर्गाकडून पशू-पक्ष्यांकडून मिळाल्याशिवाय शेतकरी शेतीची कामांना सुरुवात करत नाहीत. यात पावसाचा अचूक अंदाज देणार व मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बहरून येणार बाव्ह्याचं झाड होय. या झाडाला पिवळी फुले येतात, ती एवढी असतात की झाडाची पाने दिसतच नाहीत, ज्या वेळेस या झाडाला तुरळक फुले येतील, त्या वेळेस पाऊस अवेळी व अल्प समजला जातो, तर बहरून आला तर मुबलक समजला जातो. हा पहिला अंदाज तर मे महिन्यात जर कावळ्याने गावालगतच्या झाडाच्या मजबूत बेचकीयुक्त फांदीवर घरटे बांधले, तर वादळीवारा, विजा कोसळणे धुवाँधार पाऊस होणार आणि जर गावाबाहेरील झाडाच्या शेंड्यावरील फांदीवर घरटे बाधले तर तुरळक सरीचा व कमी पाऊस पडणार. हा झाला कावळ्याचा अंदाज.

शेतावरील मुंग्यानी वारूळ करताना एक ते दीड इंच केले, तर पाऊस कमी पडणार व जर हेच वारून १५-२० इंच करून त्याला तांबड्या मातीने बाहेरून सारवल्या सारखे पॅकबंद केले, तर धुव्वांधार पाऊस चार महिने बरसणारच. अशाच प्रकारे वाळवीच्या झुंडी निघू लागल्या, पतंगाचे थवे उडताना दिसू लागले, तर पाऊस पडणार हे अचूक संकेत मिळाले की, शेतकरी पेरणीला सुरुवात करतो; परंतु या उलट संकेत आले, तर बेभरवशाचा पाऊस म्हणून सावध पवित्रा घेत भातपिकासोबत कमी पावसात येणारी नाचणी, वरई, भूईमुग, मक्यांच कणीस या नगदी पिकावर भर देतात व हा शेकडो वर्षाचा अंदाज अद्यापही अचूक असून याच अंदाजावर शेतकरी तरी खरोखरंच अवलंबून असून तो कधीच फोल ठरत नाहीच

निसर्गाच्या लहरीपणामुळे बळीराजाचे नुकसान

खरीप हंगामात अक्षरश: अवकाळी पावसाने त्राहिमाम् माजवला होता, यामुळे बळीराजाचे मोठे नुकसान झाले होते. या दुःखातून कसातरी बळीराजा सावरला आणि रब्बी हंगामाकडे वळला. मात्र रब्बी हंगामाच्या सुरुवातीलाच निसर्गाची अवकृपा बघायला मिळाली, हंगामाच्या सुरुवातीला अवकाळी पावसाचे सावट होते, त्यावेळी शेतकरी बांधवांनी योग्य नियोजनाने रब्बीची पिके वाचवली, त्यानंतर अवकाळी पावसाने राज्यात बरेच नुकसान केल्याचे पाहायला मिळाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -