Friday, May 9, 2025

विदेशमहत्वाची बातमी

कोरोनाचा कहर! सौदी अरेबियामध्ये भारतासह १६ देशात प्रवास करण्यास बंदी

सौदी अरेबिया : जगातील अनेक देशामध्ये कोरोनाने पुन्हा डोके वर काढण्यास सुरूवात केली आहे. भारतासह सौदीमध्ये कोरोनाच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. यामुळे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता गेल्या आठवड्यापासून सौदी अरेबियाने भारतासह १६ देशात प्रवास करण्यास बंदी घातली आहे. यामध्ये सिरीया, लेबनान तुर्की, इराण, अफगाणिस्तान, यमन, सोमालिया, इथियोपिया, कांगो, लिबीया, इंडोनेशिया, व्हिएतनाम, आर्मेनिया, बेलारूस आणि बेनेजुएला या देशांचा समावेश आहे. कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. गल्फ न्यूजने या विषयी माहिती दिली आहे


दरम्यान सौदी अरेबियाच्या आरोग्य मंत्रालयाने मंकीपॉक्सचा एकही रुग्ण नसल्याची माहिती दिली आहे. जर एखादा रुग्ण सापडला तर आरोग्यव्यवस्था सक्षम असल्याचे सांगितले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने ११ देशात मंकीपॉक्सचे ८० रुग्ण आढळल्याची माहिती दिली आहे.



गेल्या २४ तासांत १६७५ नवे कोरोनाबाधित


देशात गेल्या २४ तासांत कोरोनाच्या १ हजार ६७५ रुग्णांची नोंद झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, कोरोनामुळे ३१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी २३ मे रोजी कोरोना व्हायरसची लागण झालेल्या २०२२ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली होती. अशातच देशात एकूण कोरोनाबाधितांची संख्या वाढून ४,३१,४०,०६८ वर पोहोचली आहे. अशातच, गेल्या काही दिवसांत कोरोनाबाधितांच्या संख्येत काहीशी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे सध्याच्या सक्रिय रुग्णांची संख्या वाढून १४,४८१ वर पोहोचली आहे.

Comments
Add Comment