बोईसर (वार्ताहर) : बोईसर पूर्वेला असलेल्या सूर्यानदीच्या पात्रात गेल्या काही दिवसांपासून जिलेटीन काडतूसचा वापर करून मासेमारी केली जात आहे. तसेच नदी पात्रातील पाणी कमी झाल्याने मासेमारीसाठी घातक औषधांचा वापर केला जात असल्याने लाखोंच्या संख्येने लहान मासे मृत होत असून, त्याचा थर पाण्यावर तरंगत आहे. याच नदीपात्रात काही दिवसांपासून पानमांजराचा वावर दिसून आल्याने संबधित प्रकारांनी या प्राण्याचा जीव धोक्यात आल्याचे स्पष्ट होत आहे.
सूर्या नदीपात्रात मासवन गावच्या हद्दीत दुर्मिळ पाणमांजराचा वावर आढळून आल्याने सूर्या नदी प्रदूषणापासून मुक्त आणि नदीत प्राण्यांचा नैसर्गिक अधिवास टिकून असल्याचे समाधान पर्यावरणप्रेमी, नागरिक जरी व्यक्त करीत असले तरी नदीपात्रात स्फोटके आणि कीटकनाशकांचा वापर करून अवैध मासेमारी केली जात असल्याने संरक्षित पाणमांजराचे संरक्षण करण्याची नितांत गरज आहे.
नदीपात्रात जिलेटीनचा वापर करून मासेमारी केली जात आहे ते प्रमाण आता दिवसेंदिवस वाढतच आहे. पण हे जिलेटीन देणारे आहेत तरी कोण? या सूर्या नदीच्या मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस यंत्रणेकडून प्रयत्न करणे गरजेचे आहे.
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…