मंगळुरू : वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीचा वाद कोर्टात सुरू असतानाच कर्नाटकातील मंगळुरूच्या एका मशिदीच्या खाली हिंदू मंदिरांसारखी स्थापत्य रचना सापडली आहे. मशिदीच्या नुतनीकरणाचे काम सुरू असताना या वास्तूशिल्पाचा शोध लागला आहे.
यासंदर्भातील माहितीनुसार मंगळुरूमधील गुरुप्रा तालुक्यातील मलाल मार्केट परिसरात ही मशीद आहे. या मशिदीच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे. त्यावेळी इथे एक हिंदू मंदिरासारखी स्थापत्य रचना आढळून आली आहे. मशीद बांधण्यापूर्वी मंदिर अस्तित्वात होते, असा दावा विश्व हिंदू परिषदेने केला असून कागदपत्रांची पडताळणी होईपर्यंत नूतनीकरणाचे काम थांबवावे असे आवाहन त्यांनी जिल्हा प्रशासनाला केले आहे. तर, जिल्हा प्रशासनाने दोन्ही समुदायांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.
वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीवरून वाद चिघळला आहे. याठिकाणी मंदिर पाडून मशीद बांधण्यात आली, असा दावा हिंदू संघटनांनी केला आहे. तर मुस्लीम समुदायाने प्रार्थनास्थळांसंबंधीत कायद्याचा उल्लेख केला आहे. कोणत्याही प्रार्थनास्थळांचे दुसऱ्या प्रार्थनास्थळांमध्ये रुपांतर करू नये, असा हा कायदा होता. पण, वाराणसी न्यायालयाने मशिदीचे सर्वेक्षण करण्याचे आदेश या कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप मुस्लीम संघटनांनी केला आहे. हे प्रकरण आता न्यायप्रविष्ट आहे.
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…