डेहराडून : उत्तराखंडमध्ये महामार्गाची सुरक्षा भिंत कोसळल्याने सुमारे १० हजार लोक अडकले असल्याची माहिती समोर आली आहे. उत्तराखंडमधील यमुनोत्री मंदिराकडे जाणाऱ्या महामार्गावर ही सुरक्षा भिंत कोसळल्याची घटना घडली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतुक ठप्प झाली असून महामार्गालगत विविध ठिकाणी 10 हजार लोक अडकल्याचे सांगण्यात येत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या रस्त्यावर सुरक्षा भिंत कोसळली आहे तो रस्ता पूर्ववत करण्यासाठी ३ दिवस लागू शकतात असं सांगितलं जातंय. दरम्यान या रस्त्यावरून वाहतुक करणाऱ्या प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. मोठ्या प्रमाणावर पर्यटकही अडकल्याची माहिती समोर आली असून स्थानिक लोकांच्या मदतीने अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्याचे काम चालू आहे.
लोकांना बाहेर काढण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून मदत करण्यात येत आहे. लहान वाहनांमधून काही प्रवाशांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण मोठ्या वाहनांमधील लोकांना तसेच लांबून आलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी अडचणी येत असल्याची माहिती आहे. तसेच रस्त्यावरील अडथळा दूर करण्यासाठीही प्रयत्न केले जात आहेत.
नवी दिल्ली : भारताच्या पुरुष क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक (हेड कोच) गौतम गंभीर याला आयसिस…
मुंबई: उन्हाळा आला की तो आपल्यासोबत अनेक आव्हाने घेऊन येतो. घामामुळे आणि तीव्र सूर्यप्रकाशामुळे त्वचेला…
दिवसभर तुमची त्वचा ताजी राहील मुंबई: उन्हाळ्यात आपण आपल्या त्वचेची काळजी घेतली पाहिजे. कारण आता…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान सागरी तसेच भू सीमा मोठी आहे. भू…
मुंबई : महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या आणि जम्मू कश्मीर मध्ये दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर तिथे अडकलेल्या…
मुंबई(ज्ञानेश सावंत): राजस्थानने सलग चार सामने गमावले आहेत त्यापैकी तीन सामने अगदी थोड्या अंतराने गमावले…