तमाशातील गाण्यांवर मुलींना नाचवून लाल महाल बदनाम केला जात असल्याचा संभाजी ब्रिगेडचा आरोप

पुणे : लाल महाल उन्हाळ्याच्या सुट्टीत पुणे महापालिकेने बंद ठेवला आहे. हजारो पर्यटक जिजाऊ-शिवरायांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी येतात. मात्र पुणे महापालिका आणि तिथल्या सुरक्षा रक्षकांकडून लाल महाल बंद ठेवण्यात आलेला आहे. मात्र दुसरीकडे जिजाऊ-शिवरायांच्या लाल महालात रिल्स काढण्याच्या नादात चित्रपटातील तमाशाच्या गाण्यावर मुलींना नाचवले जात आहे. जिजाऊंच्या समोर असले नाचगाण्यांचे प्रकार हे लाल महालाची बदनामी करणारे आहेत.


मानसी पाटील, कुलदीप बापट आणि केदार अवसरे यांनी एक गाणे लाल महालात चित्रित केले आहे. त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. जिजाऊ-शिवरायांची अस्मिता म्हणजे तो लाल महाल आहे. हजारो शिवप्रेमी लाल महालात जाऊन नतमस्तक होत असतात. त्याच ठिकाणी लाल महाल बंद असताना चित्रपटाची घाणेरडी गाणी चित्रीत करून लाल महाल बदनाम केला जात आहे. या जिजाऊ-शिवरायांनी सोन्याचा नांगर चालून हे पुणे वसवले, त्याच जिजाऊंच्या लाल महालामध्ये अशा पद्धतीची गाणी चित्रित करणे हे निषेधार्ह आहे. हा लाल महालाचा अवमान आहे.

Comments
Add Comment

लक्षवेधींची संख्या कमी केल्याने सत्ताधारी आणि विरोधी आमदारांकडून नाराजी

गटनेत्यांची बैठक घेणार; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे आश्वासन मुंबई : राज्य विधिमंडळाच्या

भारतीय जनता युवा मोर्चा, मुंबईच्या अध्यक्षपदी दीपक सिंह यांची नियुक्ती

मुंबई : भारतीय जनता युवा मोर्चा, मुंबईचे महामंत्री दीपक आजाद सिंह यांची आज पक्षाचे मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम

Pune Crime: बर्थडे पार्टीत सनमचा मृत्यू, शरीरात आढळलं पुरुषाचं हृदय; थरारक प्रकरण 13 वर्षानंतरही रहस्यच

पुणे: भारतीय गुन्हेगारी इतिहासातील सर्वात रहस्यमय आणि अंगावर शहारे आणणारं प्रकरण म्हणून 'सनम हसन केस' ओळखली जाते.

पुण्याच्या इंदिरा युनिव्हर्सिटीच्या संचालकांनी मानले उपमुख्यमंत्री शिंदेंचे आभार

मुंबई: “आजवर तुमच्याबद्दल फक्त ऐकून होते, मात्र तुम्ही प्रत्यक्षात संकटाच्या वेळी मदतीला धावून येता, याची

करारी पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत पूजा सावंत

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत आघाडीच्या नायिकेला पोलिसांच्या वर्दीत पाहणं हे तसं दुर्मिळच. मात्र आगामी

आशिष शेलार यांनी केली ‘पीएम व्हिजन टू आर्ट’ स्पर्धेच्या विजेत्यांच्या नावाची घोषणा

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त गेल्या वर्षी संपूर्ण भारत देशात ‘पीएम व्हिजन टू