नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून पेट्रोल ९.५० तर डिझेल ७ रुपयांनी स्वस्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे वाढत्या महागाई दरम्यान सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे. अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी ही घोषणा केली आहे.
अर्थमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, इंधनाच्या वाढत्या किमतींमुळे केंद्र सरकारने शनिवारी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केली आहे. यामुळे पेट्रोलचे दर प्रतिलिटर ९.५ रुपये आणि डिझेलच्या किमती ७ रुपये प्रति लिटरने कमी होतील, असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले.
पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या वाढत्या किंमतींवरून सुरू असलेल्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने या उत्पादनांवरील उत्पादन शुल्क कमी करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. शनिवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली आहे.
निर्मला सीतारामण यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, “केंद्राने पेट्रोलवर ८ रुपये प्रति लिटर आणि डिझेलवरील ६ रुपये प्रति लिटर केंद्रीय उत्पादन शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पेट्रोलचे दर ९.५ रुपये आणि डिझेलचे दर ७ रुपयांनी कमी होणार आहे.
मुंबई : कोणे एके काळी राष्ट्रपती पुरस्कार विजेता ठरलेला पोलीस अधिकारी आता जन्मठेपेची शिक्षा भोगणार…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण अष्टमी, शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा, योग साध्व. चंद्र राशी…
मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने ३४ क्रिकेटपटूंसोबतच्या कराराची घोषणा केली आहे. रोहित…
मुंबई : मोहम्मद अजमल कसाबसह दहा पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी हल्ला केला.…
ऊन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला हायड्रेट ठेवणं खूप महत्वाचं असते. ऊन्हाळ्याच्या दिवसांत खाण्यापिण्याच्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी…