पुणे : लाल महाल लावणी प्रकरणी तिघांविरोधात फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाल महालात लावणीवर थिरकणाऱ्या वैष्णवी पाटील, कुलदीप बापट आणि केदार अवसरे यांचा यात समावेश आहे. रखवालदार राकेश सोनवणे यांनी याप्रकरणी तक्रार दिली. पवित्र वास्तूचे पावित्र्य भंग केले म्हणून हा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १६ एप्रिल रोजी वैष्णवी पाटील हिने आणखी दोन सहकाऱ्यांच्या मदतीने लावणीवर नृत्य करीत असल्याचे व्हिडिओ शूट केले होते. या नंतर शिवप्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती.