मुंबई : “राज ठाकरे यांचा दौरा स्थगित झाला आहे, रद्द झाला नाही” असे म्हणत भाजपाचे नेते प्रविण दरेकर यांनी शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. शिवसेनेचा आणि संजय राऊतांचा वापर राष्ट्रवादी प्रवक्ता म्हणून वापर करत असून शिवसेना रसातळाला जात आहे” अशी बोचरी टीका दरेकरांनी केली आहे.
“तुमचा वापर होत आहे, आणि त्यामुळे तुमचे नुकसान होत आहे. राष्ट्रवादीच्या वापरामुळे शिवसेनेची दुर्दशा होत आहे याकडे लक्ष द्या.” असे ते राऊतांना म्हणाले.
“महाविकास आघाडी सरकार बनवत असताना सगळी शिवसेना राष्ट्रवादीची बटीक म्हणून संजय राऊत यांनी ठेवली आहे. त्यातून तुम्हाला काय मिळाले याचा अभ्यास त्यांनी करावा, दुसऱ्यांचे शहाणपण काढण्यापेक्षा आपल्याकडे लक्ष द्या” असे म्हणत दरेकरांनी राऊतांना फटकारले आहे.
राज ठाकरे यांच्या दौऱ्याला उत्तर प्रदेशचे खासदारांनी विरोध केल्याच्या प्रकरणावर बोलताना ते म्हणाले की, ते त्यांचे वैयक्तिक मत होते, काही लोकांनी त्यांना पाठिंबाही दिला पण ही त्यांची अधिकृत भुमिका नव्हती, हा प्रश्न चर्चेने सोडवला जाईल आणि राज ठाकरेंचा दौराही होईल” असे ते म्हणाले.
व्हॅटिकन सिटी : रोमन कॅथलिक चर्चचे २६६ वे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांचे सोमवारी ८८…
महिलांना त्यांच्या पायांचे सौंदर्य वाढवण्यासाठी अँकलेट परिधान करायला फार आवडते. विवाहित महिलांसोबतच अविवाहित मुलींनाही अँकलेट…
मुंबई : लव रंजन आणि अंकुर गर्ग यांच्या लव फिल्म्सने ‘देवमाणूस’मधून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले…
बंगळुरू : कर्नाटकचे माजी पोलीस महासंचालक अर्थात माजी डीजीपी ओम प्रकाश यांची राहत्या घरातच हत्या…
मुंबई : कोणे एके काळी राष्ट्रपती पुरस्कार विजेता ठरलेला पोलीस अधिकारी आता जन्मठेपेची शिक्षा भोगणार…
मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…