सांगली : सांगली जिल्ह्यासह जत तालुक्यातल्या दुष्काळी भागातही मान्सूनपूर्व पाऊस तुफान पडला आहे. त्यामुळे काही ठिकाणी पूल पाण्याखाली गेले. तर ओढे-नाले तुडूंब भरून वाहत आहेत.
जत तालुक्यात गेल्या बारा तासापासून मान्सूनपूर्व धुवाँधार असा पाऊस सुरू आहे. पूर्व भागात पावसाची संततधारही अद्याप कायम आहे. गेल्या अनेक वर्षातील हा सर्वात मोठा मान्सूनपूर्व पाऊस असल्याचे सांगण्यात येत आहे. गुरुवारी दुपारी सुरू झालेला पाऊस अजूनही सुरूच आहे. पावसाच्या मध्यम ते हलक्या सरी सतत बरसत आहेत.
तालुक्यात सर्वत्र हा पाऊस सुरूच असून बहुतांशी ओढे, नाले तुडूंब भरून वाहत आहेत. त्यामुळे वळसंग ते सोर्डी रस्ता पुलावरून पाणी वाहत असल्याने बंद झाला आहे. तसेच उमराणी, बिळुर, मुचुंडी, शेगाव, वाळेखिंडी, जत शहर आदी भागात जोरदार पाऊस झाला आहे. पावसाने मोठा दिलासा दिला असला तरी काही पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
तसेच महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रमधील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले तीर्थक्षेत्र गुड्डापुर येथील मंदिर आवारात मोठ्या प्रमाणात पाणी घुसले आहे. या मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गावर गुढघाभर पाणी साचले असून दर्शनासाठी आलेल्या भाविकांना पाण्यातून प्रदक्षिणा करावी लागत आहे. तीर्थक्षेत्र गुड्डापुर जलमय होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
बंगलोर: इंडियन प्रीमियर लीगच्या ४२व्या सामन्यात आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा सामना राजस्थान रॉयल्सशी होत आहे.…
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, मोदी सरकारने पाकिस्तान संबंधित राजकीय, आर्थिक आणि राजनैतिक आघाड्यांवर काही…
१८४ प्रवाशांना घेऊन राज्य सरकारची दोन विशेष विमाने पोहोचली २३२ प्रवाशांसाठी उद्या आणखी एक विशेष…
पहलगाम हल्ल्यानंतर 'फौजी' ची अभिनेत्री इमानवी इस्माईलला विरोध Prabhas Actress Imanvi Esmail: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण…
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात उष्णता प्रचंड वाढत (Heat Wave) चालली आहे. एप्रिल महिन्यात…
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर भारतात सुरू असलेल्या राजकीय…