मुंबईत नालेसफाईची कामे केवळ ३५ टक्केच!

मुंबई (प्रतिनिधी) : नालेसफाईच्या कामांबाबत भाजप आक्रमक असून गुरुवारी भाजपने दुसऱ्यांदा मुंबईतील नालेसफाईचा पाहणी दौरा केला. मुंबईतील नालेसफाईची कामे काटावर पास व्हावे एवढी ३५ टक्केच झाली असून प्रशासन जी आकडेवारी देत आहे ती रतन खत्रीचे आकडे असल्याचा आरोप भाजप नेते आमदार अॅड. आशिष शेलार यांनी केला. २५ वर्षांच्या सत्तेनंतर मुंबईकरांना सुरक्षेची हमी देऊ शकत नसतील तर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईकरांची माफी मागावी असे देखील शेलार म्हणाले.


आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या नगरसेवकांनी मुंबईतील नालेसफाईच्या कामाचा दुसऱ्या टप्प्यातील पाहणी दौरा गुरुवारी केला. पालिका गटनेते प्रभाकर शिंदे, पक्ष नेते विनोद मिश्रा, प्रवक्ते भालचंद्र शिरसाट यांच्यासह आपल्या भाजप नगरसेवक सहभागी झाले होते. यात मालाड येथील वलनाई, जुहू येथील एसएनडीटी तर कुर्ला येथील मिलिंद नगर नाल्यावर जाऊन कामाची पाहणी करण्यात आली. या तिन्ही ठिकाणी भयावह चित्र असून नाल्यामध्ये गाळाचे ढिगारे पहायला मिळत आहेत. दरम्यान या दौऱ्यानंतर भाजपच्या शिष्टमंडळाने पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांची भेट घेऊन त्यांना याबाबत निवेदनही दिले आहे.


ज्या गोष्टी टाळता येऊ शकतात, पूर्ण होऊ शकतात, नियोजन होऊ शकते अशा गोष्टी सुद्धा पालिका प्रशासन जाणून-बुजून करताना दिसत नाही. टाळाटाळ केली जाते आहे. हा कुठला कट आहे? असे शेलार म्हणाले. आम्ही आज पालिका आयुक्तांना भेटणार असे कळताच पालकमंत्र्यांनी धावाधाव करून ते आयुक्तांना भेटून गेले. एवढे दिवस हे कोठे होते? असा सवाल करत शेलार यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे.


दरम्यान पावसाळ्यापूर्वी करावी लागणारी वृक्ष छाटणी अद्याप झालेली नाही. दरडी कोसळणे, झाडे कोसळणे, मोडकळीस आलेल्या इमारती याबाबतचे नियोजन करण्यात आलेले नाही. याबाबत गुरुवारी बैठक झाली असे पालिका आयुक्तांनी सांगितले. हे सर्व पाहता पालिका प्रशासनाचा निद्रानाश कसा होणार आणि कधी होणार? हाच एक प्रश्न आहे. मुंबईमध्ये पावसाळ्यात जी परिस्थिती उद्भवेल त्याला प्रशासनाची दिरंगाई आणि सत्ताधारी शिवसेनेचे पळकाढू धोरण जबाबदार असेल, असेही आशिष शेलारयांनी सांगितले.

Comments
Add Comment

महापालिका शाळांमध्ये वर्षातून दोनदा भरवा विज्ञान प्रदर्शन

मुंबई : विद्यार्थ्यांमधील चिकित्सक वृत्तीला वाव देण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने आयोजित केलेले ‘विज्ञान

मुंबईतील फेरीवाला माफियाराज कायमचेच उखडून टाका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील वाढत्या फेरीवाल्यांवरील कारवाई सध्या प्रशासनाने कडक केली असली तरी या

तुमच्यापेक्षा सभागृहात गोंधळ घालण्यात आम्ही एक्सपर्ट

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेचे सर्व पक्षांच्या नगरसेवकांना सोबत घेवून चांगल्याप्रकारे कामकाज क

शाळा दत्तक धोरण रद्द करण्याची काँग्रेस आमदार पुत्राची मागणी नामंजूर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेने खासगी संस्था, स्वयंसेवी संस्था आदींना महापालिकेच्या दिलेल्या दत्तक

मासिक पाळी दरम्यान रजा योग्य की अयोग्य?

राज्य महिला आयोगाच्या वतीने चर्चासत्राचे आयोजन मुंबई : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून मासिक पाळी दरम्यान

कनिष्ठ अभियंता संवर्गातील भरतीबाबत न्यायालयात सक्षम बाजू मांडा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या नगर अभियंता विभाग अंतर्गत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/यांत्रिकी व