लखनऊ : उत्तर प्रदेशमधील मशिदीवरील उतरवलेले भोंगे शाळांवर लावले जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिली आहे.
“संवादाच्या माध्यमातून आम्ही मशिदींवर लावलेले अनधिकृत भोंगे खाली उतरवले आहेत. अधिकृत लाउडस्पीकरचा आवाज हा संबंधित परिसरातच राहील, त्याचा त्रास इतरांना होता कामा नये.” असे आदेश त्यांनी दिले आहेत. खाली उतरवण्यात आलेले भोंगे शाळेत जनजागृतीसाठी लावण्यात येणार आहेत, असेही ते म्हणाले. याबरोबरच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अनधिकृत वाहन स्थानकांना दोन दिवसांच्या आत बंद करण्याचे आदेश दिले आहेत. रस्ते सुरक्षेसंदर्भातही कडक निर्देश योगींनी दिले आहेत.
सरकारने आखून दिलेले नियम आणि आवाजाची पातळीचे नियम मोडण्यात आले तर तेथील स्थानिक पोलिस अधिकारी, उपजिल्हाधिकारी आणि अन्य अधिकाऱ्यांकडून कारवाई केली जाणार आहे.
मुंबई : छोट्या व मोठ्या नाल्यांचे सुयोग्य नियोजन करुन खोलीकरण करावे, नाल्यांमधून उपसलेल्या गाळाची ४८…
मुंबई : “ज्यांना काश्मीरला जायचं आहे, त्यांनी संपर्क साधावा. काश्मीरला जाणाच्या सहलीची सुरुवात आम्ही आमच्यापासून…
डॉ. राणी खेडीकर: अध्यक्ष बाल कल्याण समिती, पुणे आज फेसबुकवर एक खूप वायरल झालेली पोस्ट…
रवींद्र मुळे: अहिल्या नगर काश्मीरमधील पहलगाम येथील क्रूर आणि भ्याड हत्याकांडाने सगळा देश हादरून गेला…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण द्वादशी शके १९४७ . चंद्र नक्षत्र पूर्वा भाद्रपदा योग ऐद्र.…
काश्मीरमधील पहलगाम येथील बैसरनमध्ये दहशतवाद्यांनी भारतीय पर्यटकांवर केलेल्या हल्ल्याने भारताच्या सर्वोच्च स्थानी असलेल्या जम्मूपासून ते…