हिंमत असेल, तर आधी नाव बदलण्यामागचे रहस्य सांगा

मनसे नेते अखिल चित्रे यांचे दीपाली सय्यद यांना खुले आव्हान


मुंबई : "तुम्हाला काय उत्तर द्यायचे? म्हणून आम्ही तुम्हाला इतके दिवस वाईड बॉल म्हणून उत्तर देत नव्हतो. इतके तर सरडाही रंग बदलत नाही, जितकी तुम्ही नावे बदलता. आप ते शिवसंग्राम ते शिवसेना हा तुमचा विचार बदलत आणि नाव बदलत झालेला प्रवास आहे. तुमच्यात हिंमत असेल, तर आधी नाव बदलण्यामागचे रहस्य जनतेला आधी सांगा. नंतर हिंदुत्वाच्या, शिवसेनेच्या, बाळासाहेबांच्या विचारांच्या गप्पा मारा. आम्ही अपेक्षा करतो की तुम्ही उत्तर द्याल" अशा शब्दांत मनसे नेते अखिल चित्रे य़ांनी दीपाली सय्यद यांना जाहीर आव्हान दिले आहे.


https://twitter.com/akhil1485/status/1526713945616445441

शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी राज ठाकरेंवर खोचक शब्दांत टीका केल्यानंतर आता मनसेने दीपाली सय्यद यांना खुले आव्हान दिले आहे. "पावसाचे कारण देऊन मैदान सोडले. भोंग्याचे कारण देऊन देशपांडे पळाले. अयोध्याचे कंत्राट अर्धेच मिळाले. मुन्नाभाईच्या नावाने महाराष्ट्राला मामु मिळाले" असे ट्विट दीपाली यांनी केले आहे. यानंतर आता मनसेने जोरदार हल्लाबोल केला आहे. "अवसरवादी ताई, तुम्हाला धड तुमचे नाव माहिती नाही. प्रत्येक वेळी राजकारणासाठी नाव बदलणाऱ्या तुम्ही" असे म्हणत मनसे नेते अखिल चित्रे यांनी दीपाली सय्यद यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.


अखिल चित्रे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून काही स्क्रिनशॉट शेअर करत ट्विट केले आहे. तसेच "तुमच्यात हिंमत असेल, तर आधी नाव बदलण्यामागचे रहस्य जनतेला आधी सांगा. नंतर हिंदुत्वाच्या, शिवसेनेच्या, बाळासाहेबांच्या विचारांच्या गप्पा मारा" असे ही अखिल चित्रे यांनी म्हटले आहे.


"अवसरवादी ताई, तुम्हाला धड तुमचे नाव माहिती नाही. प्रत्येक वेळी राजकारणासाठी नाव बदलणाऱ्या तुम्ही. २०१४ साली अहमदनगरमधून निवडणूक लढवली, तर नाव दीपाली सय्यद. २०१९ ला शिवसेनेकडून मुंब्रा-कळव्यातून निवडणूक लढवली, तर नाव सोफिया जहांगीर सय्यद. शिवसेनेत आणि शिवसंग्राममध्ये असताना प्रचारासाठी नाव दीपाली भोसले सय्यद. वारंवार राजकारणासाठी स्वत:चे नाव बदलणाऱ्या तुम्ही. तुम्हाला अवसरवादी नेत्या म्हणावे लागेल. तुम्ही इतरांना नावे ठेवता?" असे अखिल चित्रे यांनी जारी केलेल्या व्हिडीओमध्ये म्हटले आहे.

Comments
Add Comment

तानसा धरणावर १०० मेगावॉटचा सौर ऊर्जा प्रकल्प; महापालिकेचे वाचणार वर्षाला १६५ कोटी रुपये

मुंबई (खास प्रतिनिधी) : ​मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या महत्त्वाच्या तानसा धरणावर आता वीज निर्मिती प्रकल्प उभारला

आश्रय योजनेतील पहिल्या ५१२ सदनिकांचे डिसेंबर अखेरपर्यंत सफाई कामगारांना होणार वाटप

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई शहराला स्वच्छ ठेवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या महानगरपालिकेच्या सफाई

आज मुंबईत पंतप्रधान मोदींची 'समुद्री व्हिजन' परिषद!

'मॅरिटाइम सीईओ फोरम'ला करणार संबोधित; १० लाख कोटींच्या गुंतवणुकीचे करार होणार मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज

जनगणना २०२७: मुंबईत पूर्व चाचणी चेंबूर एम पश्चिम विभागात

मुंबई (खास प्रतिनिधी) : जनगणना - २०२७ च्या तयारीचा एक भाग म्हणून, पूर्वचाचणी घेतली जाणार आहे. ज्यामध्ये जनगणनेच्या

महाराष्ट्रातील ७ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई: महाराष्ट्र शासनाने नुकतेच प्रशासकीय कामकाजात मोठे फेरबदल केले असून, सात वरिष्ठ भारतीय प्रशासकीय सेवा (IAS)

नोव्हेंबर महिन्यात कोणत्या दिवशी बँका राहणार बंद? जाणून घ्या...

मुंबई : नोव्हेंबर महिन्यात बँकांशी संबंधित कोणतेही काम करायचे असल्यास आधीच सावधान राहा, कारण नोव्हेंबरमध्ये