औरंगजेबाची कबर पर्यटकांसाठी पाच दिवस बंद

  257

औरंगाबाद : औरंगाबाद येथील खुल्ताबाद येथे असलेली औरंगजेबाची कबर पर्यटकांसाठी पाच दिवसांसाठी बंद ठेवण्यात आलेली आहे. औरंगजेब कबर कमिटीच्या मागणीनंतर पुरातत्त्व खात्याने हा निर्णय घेतला आहे.


यासाठी औरंगजेब कबर कमिटीने यासाठी पुरातत्त्व विभागाकडे मागणी केली होती. त्यानंतर पुरातत्त्व विभागाकडून राज्यातील सद्यस्थिती पाहता औरंगजेबाची कबर पर्यटकांसाठी पाच दिवस बंद ठेवण्यात आली आहे. औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात कशाला पाहिजे असा सवाल मनसेने केल्यावर कबर परिसरातील सुरक्षेत वाढ करण्यात आली होती.


सध्या औरंगजेबाच्या कबर परिसरात बंदुकधारी पोलिसही तैनात करण्यात आले आहेत. कबरीचा परिसर पुरातत्त्व विभागाच्या नियंत्रणाखाली येतो, कमिटीच्या मागणीनंतर पुरातत्त्व खात्याने हा निर्णय घेतला आहे.


दरम्यान एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील आणि आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांनी औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेतल्यानंतर राज्यभरातून त्यांच्यावर टीका झाली होती. छत्रपती संभाजी महाराजांची क्रूर हत्या करणाऱ्या औरंगजेबाच्या कबरीवर जाण्याची गरज काय आहे? असा सवाल उपस्थित करण्यात आला होता.


मशिदी आणि मंदिराचाही वाद देशात वाढला असून त्याच पार्श्वभूमीवर औरंगजेब कबर कमिटीने पर्यटकांसाठी कबर पाच दिवस बंद ठेवण्याची मागणी केली होती. त्यावर पुरातत्त्व विभागाने हा निर्णय घेतला असून पोलिसांचा बंदोबस्त खुल्ताबादेत वाढवण्यात आला आहे.

Comments
Add Comment

कोल्हापुरी चप्पलांचा वाद उच्च न्यायालयात

मुंबई (प्रतिनिधी) : कोल्हापुरी चप्पलांची 'प्रेरणा' घेत इटालियन लक्झरी फैशन ब्रेड 'प्राडा'ने बनवलेले फूटवेअर २२ जून

हरिनामाच्या गजराने दुमदुमली श्री विठ्ठलाची पंढरी, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

आषाढी एकादशीचा आज मुख्य सोहळा, पंढरीत जमली १५ लाखांवर वैष्णवांची मांदियाळी सोलापूर(सूर्यकांत आजबे) : 'अवधे गर्जे

‘निर्मल दिंडी’च्या माध्यमातून संतांचे संदेश प्रत्यक्षात उतरविण्याचे काम-मुख्यमंत्री

मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 'निर्मल दिंडी', 'चरणसेवा' आणि 'आरोग्यवारी' उपक्रमाचा

आषाढी वारीत भक्तीचा गजर आणि स्वच्छतेचा संदेश!

पंढरपूरच्या आषाढी वारीत सुमित ग्रुपच्या स्वच्छता मोहिमेचा अनोखा संगम पंढरपूर: आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या

महाराष्ट्र हादरला! धावत्या रिक्षात अल्पवयीन मुलीचा विनयभंग

रिक्षा चालक जाफर खान सुबेदार खान अटक अकोला: महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना काही कमी होताना दिसत नाहीयेत.

फडणवीस यांनी मानले राज यांचे आभार!

मुंबई: देवेंद्र फडणवीस हे आषाढीच्या निमित्ताने आज पंढरपूरमध्ये आहेत. पंढरपुरात पत्रकारांनी प्रश्न विचारला