Wednesday, July 3, 2024
Homeताज्या घडामोडीबस चालकांच्या काम बंद आंदोलनामुळे बेस्ट प्रवाशांचे हाल

बस चालकांच्या काम बंद आंदोलनामुळे बेस्ट प्रवाशांचे हाल

मुंबई : बेस्टच्या कंत्राटी बसच्या चालकांनी आज सकाळपासून कुर्ला, वांद्रे, विक्रोळी येथील आगारात अचानक काम बंद आंदोलन पुकारले. पगार न झाल्याने कामगारांनी हे आंदोलन पुकारल्याची माहिती आहे.

कामगारांनी अचानक सुरू केलेल्या काम बंद आंदोलनामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. कामावर निघालेल्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.

कुर्ला, वांद्रे, विक्रोळी आगारातील बेस्टच्या कंत्राटी बसच्या चालकांचा ठरलेल्या दिवशी पगार झाला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या बस चालकांनी थेट काम बंद आंदोलन सुरू केले.

या आंदोलनामुळे बस सेवा उपलब्ध झाल्या नसल्याने बेस्ट उपक्रमाने अन्य आगारातील काही बस सेवा या ठिकाणी वळवल्या. मात्र, तरीही या बससेवेवर अवलंबून असणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -