अतुल जाधव
ठाणे : ठाणे महापालिकेची निवडणूक प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली असून महापालिकेने आगामी निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा अंतिम आराखडा जाहीर केला आहे. ठाणे महापालिकेने अंतिम प्रभाग रचने संदर्भातील माहिती महापालिकेच्या संकेतस्थळावर त्याचप्रमाणे महापालिका मुख्यालय या ठिकाणी सूचना फलकावर सर्व प्रभाग कार्यालये आदी ठिकाणी प्रसिद्ध करण्याबाबत प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अंतिम प्रभाग रचनेबाबत अधीसूचना नकाशा आदी माहिती यात उपलब्ध करून देण्यात आली आहे.
२०१७मध्ये चार सदस्य असलेला प्रभाग आता नव्या आराखड्यात तीन सदस्यांचा असणार आहे. लोकसंख्या निकष लक्षात घेता प्रभागांची संख्या ४७ करण्यात आली आहे. नगरसेवकांच्या संख्येत ११ ने वाढ झाली आहे. महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप आराखडा तयार करण्यात आल्यानंतर प्रभाग रचना जाहीर करण्यात आली होती. या प्रभाग रचनेवरून ठाण्यात राजकीय नाट्य रंगले होते. यानंतर नागरिकांकडून हरकती आणि सूचना मागवण्यात आल्या होत्या.
ठाणे महापालिकेची मुदत ५ मार्चला संपल्यानंतर पालिकेवर प्रशासकीय राजवट सुरू झाली होती. दरम्यान महापालिकेकडून सादर करण्यात आलेल्या प्रारूप आराखड्यावर १९६२ हरकती दाखल झाल्यानंतर त्यावर सुनावणी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अंतिम आराखडा जाहीर करण्यात आला आहे.
नवी दिल्ली : भारताच्या पुरुष क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक (हेड कोच) गौतम गंभीर याला आयसिस…
मुंबई: उन्हाळा आला की तो आपल्यासोबत अनेक आव्हाने घेऊन येतो. घामामुळे आणि तीव्र सूर्यप्रकाशामुळे त्वचेला…
दिवसभर तुमची त्वचा ताजी राहील मुंबई: उन्हाळ्यात आपण आपल्या त्वचेची काळजी घेतली पाहिजे. कारण आता…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान सागरी तसेच भू सीमा मोठी आहे. भू…
मुंबई : महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या आणि जम्मू कश्मीर मध्ये दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर तिथे अडकलेल्या…
मुंबई(ज्ञानेश सावंत): राजस्थानने सलग चार सामने गमावले आहेत त्यापैकी तीन सामने अगदी थोड्या अंतराने गमावले…