'कोकणकन्या' धावली विद्युत इंजिनाने

रत्नागिरी, (हिं. स.) :मुंबई -मडगाव कोकणकन्या एक्स्प्रेसने रत्नागिरी जिल्ह्यात निवसर-आडवलीपासूनचा पुढील प्रवास रविवारी विद्युत इंजिनाने केला. सकाळी रत्नागिरीत दाखल झालेली कोकणकन्या एक्स्प्रेस रत्नागिरीपासून पुढील प्रवासाला निघाली असता निवसर आणि आडवली स्थानकांच्या दरम्यान या गाडीच्या डिझेल इंजिनमध्ये बिघाड झाला. त्यामुळे तेथेच असलेल्या एका मालगाडीचे विजेचे इंजिन पुढील प्रवासासाठी या गाडीला जोडावे लागले.


कोकण रेल्वेच्या संपूर्ण मार्गाचे विद्युतीकरण झाल्यामुळे हा मार्ग विजेवरील गाड्या धावण्यासाठी सज्ज झाला आहे. त्यामुळे गेल्या १ मेपासून कोकण रेल्वेमार्ग मार्गावरील दहा गाड्या विद्युत इंजिनसह धावणार होत्या. मात्र काही कारणामुळे हा मुहूर्त साधला गेला नाही. दरम्यान, आज सकाळी कोकणकन्या एक्स्प्रेसचेच इंजिन निवसर ते आडवली दरम्यान बिघडले. याचवेळी या मार्गावरून धावणाऱ्या मालगाडीचे विजेचे इंजिन काढून ते कोकणकन्या एक्स्प्रेसला जोडून गाडी मडगावच्या दिशेने रवाना झाली.

Comments
Add Comment

कोकणातील राजकारणातून महत्त्वाची बातमी ! उबाठा गटाचा नेता भाजपच्या वाटेवर, सामंतांचा गौप्यस्फोट

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील उद्धव ठाकरे गटातील नेता भाजपमध्ये येणार असल्याचा गौप्यस्फोट राज्याचे उद्योग

“कोकण हा शिवसेनेचा श्वास, शिवसेना कोकणी माणसाचा विश्वास” - एकनाथ शिंदे

रत्नागिरी : रत्नागिरीतील शिवसैनिकांचा उत्साह पाहून महायुतीचा भगवा जिल्हा परिषदेवर फडकणारच, ही काळ्या दगडावरची

रत्नागिरी जिल्ह्यात मर्सिडीज बेंझ जळून खाक

रत्नागिरी : खेड तालुक्यातील नातूनगर येथे मर्सिडीज बेंझ कारला आग लागली. सोमवारी मध्यरात्री २.५० च्या सुमारास ही

गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्ग भूसंपादन मोबदला प्रक्रियेत सावळागोंधळ

चिपळूण : गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या जमिनी,

या वर्षीही हापूसची चव उशिराच; आंबा बागायतदार चिंतेत !

लांबलेल्या पावसाचा कोकणातील आंबा उत्पादनावर परिणाम रत्नागिरी (वार्ताहर) : यंदा पावसाने मुक्काम वाढविला आहे. या

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे चिपळूणमध्ये पुराचा धोका

चिपळूण (वार्ताहर) : चिपळूण शहराला असलेल्या पुराच्या धोक्याबाबत उपाययोजना सूचविण्यासाठी राज्य सरकारने जलसंपदा