Sunday, July 14, 2024
Homeक्रीडाचेन्नईने गुजरातला विजयासाठी झुंजवले

चेन्नईने गुजरातला विजयासाठी झुंजवले

मुंबई (प्रतिनिधी) : आयपीएल स्पर्धेत यंदा पदार्पणातच ‘प्ले-ऑफ’मध्ये दिमाखात प्रवेश करणाऱ्या गुजरातला तळातील चेन्नईने रविवारी विजयासाठी अनपेक्षित झुंजवले. अवघ्या १३४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातला शेवटच्या षटकापर्यंत खेळावे लागले. दरम्यान या सामन्यातील विजयामुळे गुजरातचे अव्वल स्थान आणखी भक्कम झाले आहे.

प्रत्युत्तरार्थ फलंदाजीला आलेल्या गुजरातला चांगली सुरुवात मिळाली. ५९ धावांवर त्यांचा पहिला फलंदाज बाद झाला. मात्र तरीही १३४ धावांचे लक्ष्य गाठताना गुजरातला शेवटच्या षटकापर्यंत वाट पाहावी लागली. वृद्धीमान साहाने नाबाद ६७ धावा करत संघाला विजयी लक्ष्य गाठून दिले. चेन्नईच्या मथीशा पथीराना, प्रशांत सोलंकी, मिचेल सँटनर यांनी दमदार गोलंदाजी करत गुजरातला विजयासाठी झुंजवले.

दरम्यान प्रथम फलंदाजी करत चेन्नईने २० षटकांत ५ फलंदाजांच्या बदल्यात १३३ धावांपर्यंत मजल मारली. रुतुराज गायकवाडने ५३ धावांचे योगदान दिले. त्याला नारायण जगदीशनच्या नाबाद ३९ धावांची साथ मिळाली. गुजरातच्या मोहम्मद शमी आणि अल्झारी जोसेफ यांनी चांगली गोलंदाजी करत चेन्नईला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -