Thursday, April 24, 2025

लवण रस

डॉ. लीना राजवाडे

आहारातील तिसरा रस आहे लवण रस. आज व्यवहारात आपण वापरतो ते टेबल सॉल्ट (table salt) हे खनिज आहे. सोडियम (sodium), पोटेशियम (potassium) ही दोन खनिजद्रव्ये यातून मिळतात. सोडियम ५ ग्रॅम रोज याहून अधिक प्रमाणात घेणे तसेच पोटॅशियम ३.५ ग्रॅमपेक्षा कमी घेणे हे उच्च रक्तदाब आणि नंतर हृदयविकार, किडनीचे विकार याला कारणीभूत ठरू शकते, हे संशोधनातून सिद्ध होते आहे. शरीरातील पाण्याचे प्रमाण नियंत्रणात ठेवणे, मज्जासंस्थेचे कार्य नियंत्रणात ठेवणे हे लवणाचे महत्त्वाचे काम आहे. यापैकी सोडियम हे फक्त मिठातच असते.

पोटॅशियम हे भाज्या, फळे, प्रोसेस्ड फूडमध्येही असते. परदेशात आधी प्रोसेस्ड फूडमधून जसे की चीज, ब्रेड, meat, sausages precooked and fast food यातून खाल्ले जाते. Michael Moss या लेखकाने “salt sugar fat” या पुस्तकात १९९९ मध्ये लिहिले होते की, “Food Industry has too much control on fast food dilemma. So the only way out of the fast food dilemma is to do it yourself”.

Unfortunately, कोणी ते लक्षपूर्वक ऐकले नाही. आज दुर्दैवाने भारतातही अनेकजण या फास्टफूडच्या आहारी गेलेले दिसतात. एकंदरीत मीठाचा उपयोग खूप विचारपूर्वक करायला हवा.
आता बघूयात भारतीय आहारशास्त्र या लवण रसाविषयी काय सांगते. जल आणि तेज महाभूत प्रधान असणारा हा रस आहे.

लवणो रसः आहारयोगी।

स्वतंत्र नाही तर पदार्थ बनवताना उपयोगी असा हा लवण रस आहे. उदाहरणार्थ वरण किंवा भात हा स्वतंत्र मधुर रसाचा पदार्थ बनवून आपण खातो. पण किंचित मीठ घालून ते खाऊ.

लवणो रसः पाचनः
रोचयति आहारम्।

अन्न पदार्थाचे पचन चांगले करणारा हा रस आहे. खारट रस अन्नाची रुची वाढवतो.·सर्वरसप्रत्यनीकभूतः। इतर सर्व रसांच्या परस्पर विरोधी गुणाचा असल्याने पदार्थात त्याचे प्रमाण जास्त झाल्यास, सगळा पदार्थ खारट लागतो.

अत्त्युपयोगात् पित्तं कोपयति।

प्रमाणापेक्षा जास्त खारट गोष्टी खाल्यास पित्त वाढते. रक्तात उष्णता, रौक्ष्य वाढते.

त्यामुळे रक्त दुष्ट होते. टक्कल लवकर पडणे, केस गळणे यासारख्या तक्रारीही उद्भवतात. खारट चवीचे पदार्थ जास्त खाल्याने चक्कर येते.· लवणाचे सौवर्चल, काळे मीठ, बिडलोण, सामुद्रमीठ, औद्भिद, रोमक, पांसुज, सीस आणि क्षार एवढे प्रकार आहेत.

सैंधव (Himalayan pink rock salt it balances PH ) हे लघू, फारसे उष्ण नाही असे, जळजळ न करणारे हृदयासाठी योग्य पथ्यकर आहे. सौवर्चल हे पचनानंतर तिखट रसाचे; परंतु उद्गार शुद्धी आणि रुची उत्पन्न करणारे सुगंधी आहे. काळे मीठ गंध वगळता सौवर्चलाप्रमाणेच आहे.

क्षारीय मातीपासून मिळणारे ते पांसूज मीठ. हे पचायला जड असते. औद्भिद हे भूमीच्या खालील क्षारीय जल भूमीला भेदून बाहेर येते. ते तीक्ष्ण असते. समुद्र मीठ हे पचायला जड, पचनानंतर मधुर विपाकी कफ वाढवणारे आहे. एकूण वापरताना वरील प्रकारांपैकी सैंधव नेहमी वापरावे. पुढील लेखात तिखट रसाविषयी अधिक जाणून घेऊ.

आजची गुरूकिल्ली, लवणो रसः आहारयोगी।

अन्न पदार्थ बनवताना उपयोगी असा लवण रस आहे. कमीच वापरावा.

[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -