वसईत शाळेकडून फी वसुलीसाठी वकिलाकडून पालकांना नोटिसा

नालासोपारा (वार्ताहर) : वसईतील एका शाळेने शैक्षणिक फी वसुलीसाठी चक्क वकिलाकडून पालकांना नोटिसा बजावल्या आहेत. फी भरली नाहीतर मुलांना शाळेतून काढून टाकण्याची धमकी या नोटिशीतून दिली आहे. यामुळे पालकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


वसई पश्चिम एव्हर शाईन परिसरातील सेंट फ्रान्सिन हायस्कूलने कोरोना काळापासून शैक्षणिक देयक बाकी असलेल्या अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांना वकिलामार्फत नोटिस बजावल्या आहेत. देयक वसूल करण्यासाठी शाळेने हा नवा पायंडा पाडला आहे. या नोटिसीमध्ये शाळेने पालकांना चक्क दम दिला आहे. सात दिवसांच्या आत पैसे भरण्याचे सांगितले आहे. पैसे न भरल्यास कायदेशीर कारवाई करत मुलांना शाळेतून काढून टाकले जाईल आणि त्यासाठी पूर्णत: पालक जबाबदार असतील, असे सांगितले आहे.


यासंदर्भात शाळा व्यवस्थापनाने माहिती दिली की, कोरोना काळापासून अनेक मुलांची वार्षिक शैक्षणिक देयक बाकी आहेत. कोरोना काळात शाळेने मुलांना विविध शैक्षणिक सुविधा दिल्या. त्यात ऑनलाईन वर्ग, परीक्षा तसेच शाळेच्या ॲप्लिकेशन वरून पूर्णवेळ शाळा घेतली. यामुळे शिक्षकांचा, कर्मचाऱ्यांचा पगार आणि इतर खर्च कसा काढायचा यामुळे जर पालकांनी पैसे नाही भरले तर शाळा कशी चालेल?. पालकांनी मात्र शाळेच्या विरोधात सूर लावत कोरोना काळ संपला असला तरी अनेक पालक त्याच्या आर्थिक परिणामातून सावरले नाहीत. यामुळे पालकांनी शाळेला देयकात सूट तसेच हप्त्याची मागणी केली. पण शाळेने एकही रुपया कमी केला नाही. आता वसुलीसाठी वकिलातर्फे नोटीस बजावून पालकांना मानसिक त्रास देण्याचे काम सुरु आहे.


यासंदर्भात वसई शिक्षण विभागाला माहिती विचारली असता त्यांनी यासंदर्भात कोणतीही तक्रार आली नाही. शासनाकडून कोरोना काळात पालकांची आर्थिक स्थिती खालावल्याने सर्व शाळांना १५ टक्के वार्षिक शैक्षणिक देयकात सूट देण्याचे सांगितले होते. त्याचबरोबर कोणतीही सक्ती न करता देयक वसूल करण्याचे आदेश दिले होते. केवळ देयक भरले नाही म्हणून कोणत्याही मुलाला शाळेतून काढता येत नाही. यावर कारवाई केली जाईल असे सांगितले.

Comments
Add Comment

मीरा-भाईंदर महापालिकेवर महायुतीचाच झेंडा फडकेल

पदाधिकारी निर्धार मेळाव्यात एकनाथ शिंदे यांच विश्वास भाईंदर : मीरा-भाईंदर महानगरपालिका निवडणुकीच्या

बदलापूरमध्ये फुलले 'कमळ'

नगराध्यक्षपदी रुचिता घोरपडे, नगरसेवक संख्येत बरोबरी बदलापूर  : कुळगाव–बदलापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपने

अंबरनाथमध्ये नगराध्यक्ष भाजपचाच

भाजपच्या तेजश्री करंजुले विजयी; शिंदे गटाच्या मनिषा वाळेकर पराभूत अंबरनाथ : अंबरनाथ नगर परिषद निवडणुकीचा निकाल

एसी ऑफिस सोडून मातीच्या गोण्या उचलल्या!

मोखाडा गटविकास अधिकाऱ्यांचे जलसंधारणासाठी श्रमदान मोखाडा : सरकारी योजना केवळ कागदावर किंवा आदेशापुरत्या

तलावपाळीवर नववर्षाचे स्वागत गंगा आरतीने !

३१ डिसेंबरच्या रात्री कार्यक्रम; वाराणसीहून पंडितांना आमंत्रण ठाणे : ठाणे शहर येत्या नवीन वर्षाच्या

ठाण्यात भाजप-शिंदे गटात जागावाटपाच्या वाटाघाटी

भाजपची ५० जागांची मागणी ठाणे : आगामी ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गट आणि भाजप