पालिका निवडणूक २३६ प्रभागांवरच!

मुंबई (प्रतिनिधी) : लवकरच मुंबई महापालिका निवडणुकांची तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेने केलेली प्रभाग रचना राज्य निवडणूक आयोगाने मंजूर केली असून याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे आता होणारी महापालिका निवडणूक २३६ प्रभागांवर होणार हे स्पष्ट झाले आहे.


सन २०१७ मध्ये झालेली मुंबई महापालिकेची निवडणूक ही २२७ प्रभागानुसार झाली होती. मात्र यावर्षीच्या निवडणुकीसाठी मुंबईत प्रभाग रचना वाढवण्यात आली आहे. मुंबईत वाढलेल्या लोकसंख्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मुंबईतील ९ प्रभाग वाढवले होते. त्यानुसार तयार करण्यात आलेल्या प्रभाग रचनेला राज्य निवडणूक आयोगाने मंजुरी दिली असून त्याबाबत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. आता पहिल्यांदाच ओबीसी आरक्षणा शिवाय ही निवडणूक होणार आहे. तर ओबीसी शिवाय कशा पद्धतीने प्रभागांची रचना केली जाणार याकडे देखील सर्वांचे लक्ष लागले आहेत.


मुंबई महापालिका क्षेत्र जितक्या विभाग रचनेत व्यापता येणार आहे त्यानुसार विचार करून प्रभाग ठरवण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे आता राज्य निवडणूक आयोगाने अधिसूचना प्रसिद्ध केल्यानंतर लवकरच निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

मुलुंडमध्ये मेट्रोचा स्लॅब कोसळून १ ठार, ३ जखमी; मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

मुंबई : मुंबई मेट्रो लाईन चारच्या पॅरापेटचा काही भाग शनिवारी दुपारी मुलुंड येथील लाल बहादूर शास्त्री रोडवर

मुलुंड (पश्चिम) येथील एलबीएस मार्गावरील अपघात स्थळाला महापौर रितू तावडे, उप महापौर संजय घाडी, आमदार मिहिर कोटेचा यांची भेट

उपासनी रुग्णालयात जाऊन जखमी रुग्णांचे केले सांत्वन मुंबई : मुलुंड (पश्चिम) च्या एलबीएस मार्गावरील जॉन्सन अँड

मुक्त जागतिक व्यापार करारात भारताच्या हिताशी कोणतीही तडजोड नाही! केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयुष गोयल यांची ग्वाही

मुंबई : आत्मनिर्भर भारताच्या संकल्पपूर्तीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली देश आज प्रचंड,

Mulund Metro Slab Collapse: "दोषींवर कडक कारवाई केली जाईल"; मुलुंडमधील मेट्रो दुर्घटनेवर महापौर रितू तावडेंची पहिली प्रतिक्रिया

मुलुंड: मुलुंड पश्चिम येथे शनिवारी (१४ फेब्रुवारी) दुपारी बांधकाम सुरू असलेल्या सिमेंट मेट्रोच्या खांबाचा काही

चर्नी रोड -गिरगाव पुलाला विरोध करणाऱ्या सैफी हॉस्पिटल व्यवस्थापनाच्या विरोधात स्थानिकांचे आंदोलन - मंत्री मंगलप्रभात लोढा यांचा आंदोलनात सहभाग; मनमानी चालू देणार नाही पुल होणारच

मुंबई : चर्नी रोड-गिरगाव पुलाला विरोध करून जनतेला वेठीस धरणाऱ्या सैफी हॉस्पिटल व्यवस्थापनाच्या विरोधात

AC Local : पश्चिम रेल्वेचा प्रवाशांना मोठा दिलासा! १९ फेब्रुवारीपासून धावणार १२ नवीन एसी लोकल; लोकल फेऱ्यांमध्येही वाढ

मुंबई : मुंबईकरांचा लोकल प्रवास अधिक सुखकर आणि गारवा देणारा ठरणार आहे. पश्चिम रेल्वेने प्रवाशांच्या सुविधेसाठी