Thursday, July 18, 2024
Homeमनोरंजनकेतकी चितळे नेमकी आहे तरी कोण? तिची आतापर्यंतची वादग्रस्त प्रकरणे कोणती?

केतकी चितळे नेमकी आहे तरी कोण? तिची आतापर्यंतची वादग्रस्त प्रकरणे कोणती?

मुंबई : सतत वादात अडकणारी अभिनेत्री केतकी चितळे ही सतत तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे आणि पोस्टमुळे चर्चेत येत असते. नुकतीच तिने शरद पवारांवर एक वादग्रस्त कविता फेसबुकवर शेअर केली आहे. याप्रकरणी तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तिला ताब्यात घेतले आहे.

शरद पवारांविरोधात दोन आक्षेपार्ह पोस्ट, अभिनेत्री केतकी चितळे विरोधात गुन्हा दाखल

मात्र केतकी वादाच्या भोवऱ्यात पडल्याची ही काही पहिली वेळ नाही. सतत वादात अडकणारी ही केतकी नेमकी आहे तरी कोण? आणि तिची आतापर्यंतची वादग्रस्त प्रकरणे कोणती?

केतकी चितळेची वादग्रस्त प्रकरणे जाणून घ्या…


केतकीने छोट्या पडद्यावरील ‘तुझं माझं ब्रेकअप’ या मालिकेत भूमिका साकारली होती. मात्र या मालिकेनंतर ती फारशी कुठे दिसली नाही. एपिलेप्सी या आजारावरील पोस्टमुळेही ती चर्चेत आली होती. याच आजारामुळे आपल्याला मालिकेतून काढून टाकण्यात आल्याचा आरोप तिने केला होता.

एपिलेप्सी या आजारावर केतकी वेगवेगळे उपचार घेत आहे. तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटचे नावदेखील ‘एपिलेप्सी वॉरियर क्वीन’ असे ठेवले आहे. एकदा दात दुखीच्या त्रासाला कंटाळून केतकी एका डेंटिस्टकडे गेली होती. पण डेंटिस्टने एपिलेप्सी असल्याचे कारण सांगत केतकीचा दात काढण्यास नकार दिल्याचा आरोप एक व्हिडिओ शेअर करत केतकीने केला होता.

केतकीने छत्रपती शिवाजी महाराजांचा एका पोस्ट मध्ये एकेरी उल्लेख केला होता. यावरून बराच वादंग निर्माण झाला होता. यामुळे केतकीला ट्रोलिंगला सामोरे जावे लागले होते. या पोस्टवरून शिवसेनेच्या एका कार्यकर्त्याने धमकी दिल्याचा आरोप करत तिने स्क्रीनशॉटही शेअर केला होता.

केतकीने सोशल मीडियावर नवबौद्धांवर एका पोस्ट लिहीली होती. यात तीने नवबौद्धांवर बोचरी टिका केली होती. या वरून केतकीविरोधात नवी मुंबईतील आंबेडकरी चळवळीत सहभागी असणा-या कार्यकर्त्यांनी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

यावेळी तिने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह शब्दात टीका केली आहे. केतकीच्या या पोस्टमुळे सोशल मीडियावर वादाला तोंड फुटले आहे. राष्ट्रवादीच्या गोटातून नेत्यांनी संताप व्यक्त करत केतकीवर कारवाईची मागणी केली आहे. याप्रकरणी तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शरद पवारांविरोधात दोन आक्षेपार्ह पोस्ट, अभिनेत्री केतकी चितळे विरोधात गुन्हा दाखल

या पोस्टनंतर ती ट्रोल होत असून तिच्यावर मोठ्या प्रमाणात दोन्ही बाजूंकडून टीका-टिपण्णी होत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -