मुंबई : महानगरपालिका समाजविकास विभागाच्या वतीने प्रभाग क्रमांक १९९ मधील शालेय विद्यार्थ्यांना मोफत टॅबचे वाटप करण्यात आले.
मुंबईच्या महापौर किशोरीताई पेडणेकर यांच्या प्रयत्नाने आणि महापालिका समाजविकास विभागाच्या वतीने या मोफत टॅबचे वाटप केले. या प्रसंगी टाटा पॉवर स्पोर्टस् क्लबचे राष्ट्रीय खेळाडू सतिश दाभोळकर, शाखाप्रमुख गोपाळ खाडये, कार्यालय प्रमुख तानाजी येसादे, आण्णा तावडे आदी मान्यवर उपस्थित होते.