ठाण्यातील रस्ते कात टाकणार

ठाणे (प्रतिनिधी) : ठाण्यातील रस्ते लवकरच कात टाकणार आहेत. राज्य नगरविकास विभागाने दिलेल्या अनुदानातून ठाणे शहरांतील १२७ रस्त्यांचा विकास करण्याचा महापालिकेचा मनोदय आहे.राज्याच्या नगरविकास विभागाकडून मिळालेल्या २१४ कोटींच्या अनुदानाच्या माध्यमातून ठाणे महापालिकेने रस्ते विकासाचा मास्टर प्लॅन तयार केला असून या प्लॅनच्या माध्यमातून ठाणे शहरातील ५३ कि.मी रस्त्यांचा विकास केला जाणार आहे. यामध्ये ८२.५९ कोटींचे डांबरी रस्ते, ९५.६२ कोटींचे यूटीडब्लूटी, तर ३५.७९ कोटींच्या डांबरी रस्त्यांचा समावेश करण्यात आला आहे.


पावसाळा वगळून एका वर्षात या रस्त्यांचा विकास करण्याचे उद्दिष्ट्य पालिकेने ठेवले असून या रस्ते विकासानंतर शहरातील प्रवास वेगवान होणार असून वाहतूक कोंडीपासून देखील दिलासा मिळणार असल्याचा दावा प्रशासनाच्या वतीने करण्यात आला आहे.


ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरविकास विभागाकडून ठाण्यातील १२७ रस्त्यांसाठी सुमारे २१४ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या निधीच्या माध्यमातून १२७ रस्त्यांचे युटीडब्लूटी, डांबरीकरण आणि काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. या निधीचे सर्व प्रभागातील रस्त्यांचा समावेश करून त्यांची कामे करण्यात येणार आहे; परंतु दिवा-शिळ, नौपाडा-कोपरी या प्रभागांमध्ये सर्वाधिक निधी उपलब्ध केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे राज्य शासनाकडून प्राप्त निधीच्या विनियोगामध्ये सत्ताधाऱ्यांचा सर्वाधिक समावेश असल्याचे स्पष्ट होत आहे.


प्रभाग निहाय निधीचे वाटप करताना नौपाडा कोपरीला ४९ कोटी, माजिवडा-मानपाडा २४ कोटी, कळवा ८ कोटी, लोकमान्य, सावरकरनगर - २२ कोटी २६ लाख, वागळे इस्टेट - २६ कोटी, वर्तकनगर - १६ कोटी आणि मुंब्रा येथे ७ कोटी ४४ लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. या रस्ते विकासाच्या कामांची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली असून आता या कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

ठाण्यात भाजपचा निर्धारनामा प्रकाशित; 'अब की बार सो पार'चा भाजपला विश्वास

ठाणे : ठाणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने निर्धारनामा प्रकाशित केला. 'विकासाला गती, पर्याय

नवी मुंबईत होणार पहिली आयएमडी वेधशाळा

रायगडसह परिसरातील हवामान अंदाजात सुधारणांची अपेक्षा नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या

ठाणे महापालिका निवडणुकीत महायुतीचीच सत्ता येणार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास ठाणे : ठाणे महापालिका निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळेल आणि

नवी मुंबईत महाविकास आघाडीत गडबड ?

शिवसेना-मनसेची एकी; राष्ट्रवादीचा रुसवा ठाणे : नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत

भिवंडी-निजामपूर पालिकेत सपाचा बुरूज कोसळला

काँग्रेस-भाजप-शिवसेनेला बळकटी भिवंडी : भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सर्व राष्ट्रीय,

उल्हासनगर आरपीआयमध्ये जागावाटपावरून वाद सुरूच

जिल्हाध्यक्ष नाना बागुल यांच्याविरोधात कार्यकर्ते नाराज उल्हासनगर : उल्हासनगरमधील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया