विक्रमगड तहसीलकडून ६ कोटी ७३ लाख २० हजारांची दंडवसुली

विक्रमगड (वार्ताहर) : तालुक्यातील तहसील कार्यालयातील महसूल विभागाकडून विविध भागातील कार्यक्षेत्रानुसार जमीन महसूल व गौण खनिजांच्या अवैध धंद्याविरोधात मोहीम राबवली. महसूल नायब तहसीलदार, विविध सज्जातील तलाठी यांच्या पथकाने डबर, खडी व इतर गौण खनिज चोरट्या मार्गाने वाहतूक करणाऱ्या गाड्या पकडून आतापर्यत ६ कोटी ७३ लाख २० हजारांची दंडवसुली केल्याची महसूल विभागाने माहिती दिली.


जमीन महसूल व चोरट्या मार्गाने डबर, माती, खडी अशा गौण खनिजाची वाहतूक व उत्खन्न करण्याऱ्यांवर कडक कारवाई करून त्यांच्याकडून दंडवसुलीचे आदेश दरवर्शी प्रत्येक तहसील कार्यालयास देण्यात येतात. परंतु सद्यस्थितीत गौण खनिज उत्खन्नाबाबत केंद्रीय वन व पर्यावरण विभागाची परवानगी अनिवार्य केल्याने चोरट्या मार्गाने गौण खनिज वाहतूक संख्या अधिक होत आहे.


परंतु महसूल विभागाने सतर्क राहून चोरट्या गौण खनिजांची वाहतूक करणाऱ्या गाड्या पकडून जमीन महसूल दंडवसुली ९९ लाख ९१ हजार तर गौणखनिज दंडवसुली ५ कोटी ७३ लाख २९ हजारांची वसुली केली आहे. या वर्षांत अशीच मोहीम राबवून यापुढेही दंडवसुली केली जाईल, असेही महसूल विभागाने सांगितले आहे. शासनाकडून जमीन महसुलाकरीता १ कोटीं वसुलीचा इश्टांक देण्यात आला होता. त्यामध्ये ९९ लाख ९१ हजाराची दंडवसुली, तर चोरट्या गौणखनिचा इश्टांक १ कोटी ६१ लाख ८५ हजार असताना चारपट वसुली करीत ५कोटी ७३ लाख २९ हजार अशी एकूण ६ कोटी ७३ लाख २० हजारांची दंडाची वसुली केली आहे.

Comments
Add Comment

Virar: दारूच्या नशेत सापासोबत मस्ती बेतली जीवावर; विरारमध्ये तरुणाचा सर्पदंशाने दुर्दैवी मृत्यू

विरार: दारूच्या नशेत विषारी जातीच्या सापाला पकडणे आणि अति उत्साहाच्या भरात सापसोबतच मस्ती करणे विरार येथील एका

वसई-दिवा मार्गावर मेगाब्लॉक, शनिवारी आणि रविवारी प्रवाशांचे हाल

वसई : दिवा-वसई रोड मार्गावरील खारबाव (Kharbav) स्थानकात नवीन अप आणि डाऊन मालवाहू मार्गिकांच्या कामासाठी शनिवार आणि

धक्राकादायक! १५ वर्षाच्या भाच्याकडून आत्याचा खून

वसई : वसई परिसरामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रागाच्या भरात एका १५ वर्षीय मुलाने आपल्या आत्याचा खून

सत्तेचे गणित बिघडले; बेरजेचे गणित जमले

गणेश पाटील, विरार : वसई-विरारमध्ये एकापेक्षा जास्त नगरसेवक निवडून आणण्याची राजकीय शक्ती नसलेल्या भाजपने यावेळी

पाण्याच्या टाकीत मानवी हाडांचा सापळा

वसईच्या माणिकपूर गावातील घटना वसई : वसईच्या माणिकपूर येथील एका चाळीच्या रिकाम्या पाण्याच्या टाकीत पुरुषाच्या

अर्थसंकल्पातून पालघरसाठी विकासाची ‘महा-भेट’ : खासदार डॉ. सवरा

पालघर : केंद्रीय अर्थसंकल्पात पालघर जिल्ह्यासाठी विकासाचे नवीन दरवाजे उघडले आहेत. या बजेटमध्ये पालघरच्या