विलास खानोलकर
ऋणानुबंध असल्याशिवाय कोणीही कोणाच्या संपर्कात येत नाही. तेव्हा केवळ माणूसच नव्हे, तर पशू-पक्षी यापैकी कोणाचाही द्वेष करू नकोस. आलेल्या-गेलेल्यांचा आदर कर, भुकेलेल्यास अन्न दे, तहानलेल्यास पाणी दे, उघड्यास वस्त्र दे, वाटसरूला बसायला ओसरी दे. कोणास काही देता आले नाही तरी निदान त्यांच्यावर ओरडू तरी नकोस. कोणी कटू बोलला तर प्रत्युत्तर देऊ नकोस, एखाद्याचे चांगले करण्याचे अंगी सामर्थ्य नसेल, तर शुभाशीर्वाद दे. दुष्कर्मास प्रवृत्त होऊ नकोस. अंगी सहिष्णुता असावी. आता एकच सांगतो, तुझ्या माझ्यातली मी-तू पणाची जी भिंत आहे, ती पाडून टाक म्हणजे सर्व मार्ग मोकळा होईल. गुरू-शिष्य दोघेही एकरूप होतील. ईश्वर सर्वांचा मालक आहे. तोच सर्वांचा वाली आहे. त्याच्या मनात जे करायचे असेल, तेच तो करतो. तोच मार्ग दाखवतो. तोच सर्वांच्या इच्छा पुरवितो. काही तरी ऋणानुबंध होता म्हणूनच आपण दोघे भेटलो. तेव्हा आपण एकमेकांवरील प्रेमानेच एकमेकांना आपलेसे करू. येथे कोणी अमर नाही. देवावर आईसारखे प्रेम कर. देव तुला प्रसन्न होईल. हे ऐकून हेमांडपंत साईचरणी लीन झाले.
आज दिवस तो आईचा
अनाथांची माय सिंधुताईचा ।।१।।
तसाच तो दिन शिर्डीसाईचा
अनाथाचा खरा नाथ साईचा ।।२।।
गोरगरीबांचा आधार साईचा
रंजले गांजलेल्यांच्या साईचा ।।३।।
कधी अपंगाचा बने तो आई
आंधळ्यांना दिव्यदृष्टी दिली बाई ।।४।।
अनेक रोग्यांना बरे केले ताई
बाळाला वाचविले आगीच्या खाई ।।५।।
कोडवाल्यांनाही दवापाणी दिला बाई
बाळंतीणीची सुटका केली बनून दाई ।।६।।
संकटांच्या पर्वतांची केली राई राई
समजाद्रोह्यांची पर्वा केली नाही ।।७।।
दुर्जनांनाही फटक्यात सरळ करे साई
मुक्या गाईवासरांना चारा तो देई।।८।।
चिमणी-पाखरांना तोच जीवनदान देई
श्रद्धा सबुरी अहिंसा प्रेम वाटे साई।।९।।
अल्लाह मालिक है मंत्र साई
अलख निरंजन म्हणे साई ।।१०।।
पणतीतले पाणी पेटवी साई
प्राण्यांचीही भाषा बोले साई ।।११।।
देवमाणूस अवतरला रूपे साई
चांदीचे नवरूपे वाटे साई ।।१२।।
नवविधा भक्ती सांगे साई
जादू साई नामातच सांगे साई ।।१३।।
संसार साधा सरळ करे साई
स्वभावही साधा भोळा साई ।।१४।।
ब्रम्हा-विष्णू-महेश साई
भोळा सांब सदाशिव साई ।।१५।।
उदित उदितनारायण साई
प्रेमाच्या प्रत्येक शब्दांत साई ।।१६।।
विनम्रतेच भरला साई
गरीब जनसेवेत फिरे साई ।।१७।।
झाडाफुलांचा पुनर्जन्मच साई
आईच गंगातीर्थ म्हणे साई ।।१८।।