मुंबई (वृत्तसंस्था) : भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली सध्या खराब फॉर्ममधून जात आहे. त्यामुळे त्याच्यावर अनेकांकडून टीका होत आहे. दरम्यान विराटने पहिल्यांदाच यावर आपले मत व्यक्त केले आहे. विराटने सर्व टीकाकारांना एका वाक्यात उत्तर दिले आहे. ‘मी अशा वेळी टीव्हीचा आवाज बंद करतो, तसंच अशा लोकांच्या बोलण्याकडे लक्षही देत नाही.’ विराटने अशा प्रकारे एका वाक्यात उत्तर देत सर्व टीकाकारांना सडेतोड उत्तर दिले आहे.
आरसीबीच्या एका सोशल मीडियावरील एका मनोरंजन व्हिडीओमध्ये विराटची मुलाखत घेण्यात आली. यावेळी विराटला खराब फॉर्मबद्दल विचारण्यात आले. तेव्हा विराट म्हणाला, ”मी अशावेळी टीव्हीचा आवाज बंद करतो, तसेच अशा लोकांच्या बोलण्याकडे लक्षही देत नाही.” विराटने अशा प्रकारे एका वाक्यात उत्तर देत सर्व टीकाकारांना सडेतोड उत्तर दिले आहे.
अव्वल दर्जाचा क्रिकेटपटू विराट कोहली गेल्या काही काळापासून खराब फॉर्ममध्ये दिसत आहे. ७० शतके लगावणाऱ्या विराटने २०१९ नंतर एकही शतक लगावलेले नाही. त्यात सध्या सुरू असलेल्या आयपीएल २०२२ मध्येही विराट खास कामगिरी करत नाहीये. आतापर्यंत त्याने १२ सामन्यांत २१६ धावा करत केवळ एक अर्धशतक झळकावले आहे. दरम्यान या त्याच्या खराब फॉर्मवर सर्व स्तरातून टीका होत असताना विराटने पहिल्यांदाच यावर आपले मत व्यक्त केले आहे.