महसूल गुप्तचर संचालनालयाने सोने तस्करीचे प्रयत्न हाणून पाडले

नवी दिल्ली (प्रतिनिधी) : महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) गेल्या आठवड्यात लखनऊ आणि मुंबई येथे सलग दोन वेळा यशस्वी कारवाई करून हवाई मार्गाने संघटितपणे होणाऱ्या सोन्याच्या तस्करीचे प्रयत्न हाणून पाडले आहेत. ज्यात सोने लपवून नेण्याची सामान्य पद्धत वापरली होती.कारवाईसाठी अचूक रूपरेषा निश्चित करून, महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी दुबईहून मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, एअर कार्गो कॉम्प्लेक्स, येथे आलेल्या मालाची तपासणी केली.


आयात माहिती कागदपत्रांत याची नोंद, "वेगवेगळे सुटे भाग आणि ड्रम प्रकाराचे सफाई मशीन" म्हणून घोषित करण्यात आले होते, परंतु काळजीपूर्वक तपासणी केल्यावर ३.१० कोटी रुपये मूल्य असलेले ५.८ किलो सोने चकत्यांच्या आकाराच्या स्वरूपात आयात केलेल्या मशीनच्या दोन मोटर रोटर्समध्ये लपवून ठेवलेले आढळले. आयातदार दक्षिण मुंबईतील असून तातडीने कारवाई करून अटक करण्यात आली. या आयातदाराला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.


लखनऊमध्ये देखील डीआरआय अधिकाऱ्यांनी मुंबईतील या जप्तीच्या एक दिवस आधी दि. ५ मे रोजी आणखी एका जप्तीची कारवाई केली. त्या प्रकरणात देखील,डीआरआयने लखनऊच्या चौधरी चरण सिंग आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या एअर कार्गो कॉम्प्लेक्समध्ये "इलेक्ट्रिकल थ्रेडिंग मशीन" असल्याचे सांगितलेल्या आयात माल पकडला आणि तिथेही मशिनमध्ये सोन्याच्या चकत्या लपविल्याचे आढळले.

Comments
Add Comment

‘नरेगा’ अंतर्गत मातोश्री ग्रामसमृद्धी पाणंद रस्त्यांना मोठा दिलासा

नवी दिल्ली : ग्रामीण भागातील शेतमाल वाहतूक अधिक सुलभ आणि सुरक्षित करण्यासाठी ‘नरेगा’ अंतर्गत राबविण्यात

संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज ९ मार्चपर्यंत स्थगित

नवी दिल्ली : लोकसभेतील अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा शुक्रवारी संपला. पीठासीन अधिकारी संध्या राय यांनी

Narendra Modi: अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेल्या 'सेवा तीर्थ'चे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (१३ फेब्रुवारी) अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेल्या सेवा

Bihar: एका दाम्पत्याला रोझ डे सेलिब्रेशन पडलं महागात; पोलिसांनी उगारला कारवाईचा बडगा

बिहार: बिहारमधील मुंगेर जिल्ह्यात 'रोझ डे'चे सेलिब्रेशन एका दाम्पत्याला चांगलेच महागात पडले आहे. दारूबंदी

डिझेल गाड्या कायमच्या होणार बंद ? काय सांगतो नीती आयोगाचा अहवाल?

मुंबई: भारतात प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र सरकार २०२७ पर्यंत १० लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये

विमानात मोठ्या आवाजात गाणी ऐकणार तर......; विमान वाहतूक मंत्रालयाने जारी केले नवे नियम

मुंबई : लांबच्या ठिकाणी जलद पोहोचण्यासाठी आजकाल सर्रास विमानांचा वापर केला जातो. ट्रेन किंवा बसने प्रवास करताना