'एकटे सोमय्या नव्हे, भाजपाच्या २८ नेत्यांची प्रकरणं उघड करणार'

  64

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांच्या वादात आता संजय राऊत यांनी नवा बॉम्ब टाकला आहे. संजय राऊत गेल्या तीन दिवसांपासून किरीट सोमय्या यांच्याशी निगडीत युवक प्रतिष्ठानवर खळबळजनक आरोप करत आहेत. यासंदर्भातील ट्विट्सची मालिकाच त्यांनी सुरू केली आहे. याचाच पुढचा भाग म्हणून आज संजय राऊत यांनी युवक प्रतिष्ठानला मोतीलाल ओसवाल कंपनीकडून लाखो रुपयांचा निधी मिळाला असल्याचा आरोप केला. यावेळी राऊतांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यासह भाजपाच्या २८ नेत्यांची प्रकरणं उघड करणार असल्याचे वक्तव्य केले आहे.


https://twitter.com/rautsanjay61/status/1524214813064560640

संजय राऊतांच्या वक्तव्यानंतर भाजपाचे ते २८ नेते कोण? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. ईडीच्या चौकशीच्या फेऱ्यात असलेल्या मोतीलाल ओसवाल कंपनीकडून सोमय्यांच्या युवक प्रतिष्ठानच्या खात्यात लाखो रुपये आले होते. त्यामुळे सोमय्यांचा खरा चेहरा आता उघड झाला आहे. भाजपा भ्रष्टाचारविरोधी लढ्यात कसे काम करतेय हे आता दिसून आले आहे. त्यांच्याच हातात सगळी सूत्रं आहेत आणि हे महाराष्ट्र भ्रष्टाचार मुक्त करणार का? ज्यांच्या तोंडाला शेणाचा वास येत आहे तेच लोक दुसऱ्याच्या तोंडाचा वास घेणार का?, असा खरमरीत टोला संजय राऊत यांनी लगावला.


"आता यांचा खेळ संपला आहे. रोज ही प्रकरणं बाहेर येणार आहेत. सुरुवात त्यांनी केली होती शेवट आम्ही करू. सोमय्यांचा हा भ्रष्टाचार तर फक्त हिमनगाचं एक टोक आहे. सोमय्यांचे हे एकट्याचे प्रकरण नाही. भाजपाच्या २८ नेत्यांचे प्रकरण आहे", असे संजय राऊत म्हणाले. राऊतांच्या या वक्तव्यानंतर भाजपाचे ते २८ नेते कोण याबाबत विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत.


त्याआधी किरीट सोमय्या यांनी मोतीलाल ओसवाल कंपनीकडून लाखो रुपये त्यांच्या युवक प्रतिष्ठानसाठी घेतले, असा नवा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. "किरीट का कमाल : किरीट सोमय्या यांनी NSEL ची ५६०० कोटी शेअर्सच्या घोटाळ्यासंदर्भात ईडीकडे चौकशीची मागणी केली. मोतीलाल ओसवाल कंपनीची याप्रकरणी ईडीने चौकशी केली. स्वत: किरीट सोमय्या चौकशीसाठी कंपनी शिपायांच्या घरी गेले होते. तमाशा केला. २०१८-१९ असे दोन वर्ष सोमय्याने मोतीलाल ओसवालकडून लाखो रुपये त्याच्या युवक प्रतिष्ठानसाठी घेतले", असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे.

Comments
Add Comment

हार्बर रेल्वे ठप्प! तांत्रिक बिघाडामुळे नेरूळ ते पनवेल सेवा बंद, संध्याकाळी घरी जाणाऱ्या प्रवाशांचे हाल

तांत्रिक बिघाडामुळे आज रविवारी संध्याकाळच्या सुमारास हार्बर रेल्वे सेवा विस्कळीत नवी मुंबई: मुंबईतील मध्य

दादरचा ऐतिहासिक कबूतरखाना बंद: मुंबईची एक ओळख काळाच्या पडद्याआड

मुंबई: दादर पश्चिमेचा कबुतरखाना आता कायमचा बंद होणार आहे. एकेकाळी दादरकरांसाठी पत्ता सांगताना कबुतरखाना ही एक

सर्व प्रतिज्ञापत्रांसाठी मुद्रांक शुल्क माफ

महसूलमंत्री बावनकुळे यांची घोषणा मुंबई : सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी जोडावे लागणारे पाचशे रुपयांचे

पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत नागरिकांच्या सार्वजनिक, वैयक्तिक समस्यांवर थेट सुनावणी

जनतेच्या तक्रारींचे त्वरित निवारण  सिंधुदुर्गनगरी : शनिवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांच्या अनेक

आपल्या देशाचे नाव उंचावण्याची भावी अधिकाऱ्यांची जबाबदारी

खासदार नारायण राणे यांचे यूपीएससी गुणवंतांना मार्गदर्शन मुंबई : येत्या काळात भारत हा चौथ्या अर्थव्यवस्थेवरून

शुक्रवारच्या कारवाईनंतर दादर कबुतर खान्यावर खाद्य देणे सुरूच !

खाद्य विकणाऱ्यांसह दाणे टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याकडे दुर्लक्ष मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील कबुतर खान्यांवर