गुजरात-लखनऊच्या सामन्यावर नजरा

मुंबई (प्रतिनिधी) : आपापल्या पहिल्या मोसमातील चमकदार कामगिरीनंतर, गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स हे दोन अव्वल संघ आज इंडियन प्रीमियर लीगमध्ये दुसऱ्यांदा एकमेकांसमोर मैदानात उतरतील आणि प्लेऑफमध्ये स्थान पक्के करण्याचा प्रयत्न करतील.


गुजरात सुरुवातीपासून लीगमध्ये अव्वल स्थानावर होता. पण फलंदाजांच्या अपयशामुळे त्यांना मागील दोन सामन्यात सलग पराभवाला सामोरे जावे लागले आहे. तसेच सलग ४ सामने जिंकून लखनऊ या लढतीत आत्मविशवासाने उतरतील. मात्र नेट रनरेटमध्ये सरस ठरल्यामुळे ते गुजरातला खाली ढकलून अव्वल स्थानावर पोहोचले आहेत. अर्थात, या दोन्ही संघांचे समान १६ गुण आहेत आणि दोघांतील हा सामना जिंकणाऱ्या संघाचे प्लेऑफमधील स्थान निश्चित होईल.


हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील गुजरातला गेल्या आठवड्यात पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्सकडून पराभव पत्करावा लागला. दुसरीकडे लखनऊने त्यांचे शेवटचे चार सामने जिंकले आहेत. यामध्ये कोलकाताविरुद्धच्या शेवटच्या सामन्यातील सर्वाधिक ७५ धावांनी मिळवलेल्या विजयाचा समावेश आहे, ज्यामुळे या संघाचे मनोबल वाढलेले आहे.


लखनऊचा कर्णधार केएल राहुलने आतापर्यंत ११ सामन्यांत ४५१ धावा केल्या आहेत, ज्यात दोन शतके आणि अर्धशतकांचा समावेश आहे. लखनऊ संघ फलंदाजीत त्याच्यावर खूप अवलंबून आहे; परंतु अलीकडील सामन्यांमध्ये क्विंटन डी कॉक आणि दीपक हुडा यांनी अधिक जबाबदारी घेतली आहे, ज्यामुळे राहुलचा भार कमी झाला आहे. लखनऊचे गोलंदाजही चांगली कामगिरी करत आहेत. पंजाब किंग्ज विरुद्ध, जिथे त्यांनी १५३ धावांचा चांगला बचाव केला, तिथे केकेआरला फक्त १०१ धावा करता आल्या. वेगवान गोलंदाज आवेश खान आणि जेसन होल्डर यांनी या सामन्यात चमकदार कामगिरी केली.


समान गुण असल्यामुळे एलएसजी आणि जीटी दोन्ही संघ १८ अंकांवर पोहोचण्याच्या परिस्थितीत आहेत. राजस्थान रॉयल्सचे ११ सामन्यांतून १४ गुण आहेत आणि ते जास्तीत जास्त २० गुण मिळवू शकतात. बंगलूरुचे १२ सामन्यांतून १४ गुण आहेत आणि ते जास्तीत जास्त १८ गुण मिळवू शकतात. दिल्ली कॅपिटल्स, पंजाब किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांचे ११ सामन्यांतून १० गुण आहेत आणि ते जास्तीत जास्त १६ गुण मिळवू शकतात. त्यामुळेच आजचा विजेता संघ अंतिम चारमध्ये प्रवेश करणारा पाहिला संघ ठरेल.


गत सामन्यात गुजरातने लखनऊला ५ विकेट्सने मात दिली होती. लखनऊ त्या पराभवाचा बदला घेण्याबरोबरच शीर्ष स्थान आणखीन मजबूत करून प्लेऑफमध्ये जाणारा पहिला संघ बनण्याच्या इरद्यानेच मैदानात उतरेल आणि गुजरातही त्यात मागे नसेन त्यामुळे क्रीडा चाहत्यांसाठी आज उत्कृष्ट खेळाची पर्वणी असेल.


ठिकाण : एमसीए स्टेडियम, पुणे / वेळ : रात्री ७.३० वाजता

Comments
Add Comment

Asia Cup: टीम इंडियाने सुपर ४ साठी केले क्वालिफाय, पाकिस्तानचे काय होणार?

दुबई: टीम इंडियाने आशिया कप २०२५च्या सुपर ४ साठी क्वालिफाय केले आहे. आता या ग्रुपमधून दुसरा कोणता संघ क्वालिफाय

पाकिस्तानशी हस्तांदोलन न केल्याबद्दल टीम इंडियावर कारवाई होणार?

नवी दिल्ली: काल भारत आणि पाकिस्तान या दरम्यान दुबईत झालेल्या आशिया चषक २०२५ स्पर्धेत सूर्याच्या टीमने

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून सूर्याने पाकिस्तानी खेळाडूंशी हात नाही मिळवला, सांगितले हे कारण

मुंबई: आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात भारताने ७ विकेट राखत विजय मिळवला. या

IND vs PAK: भारताने पाकड्यांना धुतले, ७ विकेट राखत मिळवला विजय

दुबई: आशिया कप स्पर्धेतील सहाव्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर जबरदस्त विजय मिळवला आहे. पाकिस्तानने

हॉकी आशिया कपमध्ये भारतीय महिला संघ उपविजेता

अंतिम सामन्यात चीनकडून ४-१ ने पराभव बीजिंग : महिला हॉकी आशिया कपमध्ये भारतीय संघ उपविजेता राहिला. हांगझोऊ येथे