मुंबई (प्रतिनिधी) : थॅलेसेमिया हा रक्ताशी संबंधित, जनुकीय विकार आहे. लाल रक्तपेशींमधील हिमोग्लोबिन, प्रथिन निर्मितीसाठी जबाबदार असलेल्या जनुकांच्या कमतरतेमुळे किंवा जीन्समधील त्रुटींमुळे या आजाराची लागण होते. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, भारतातील ४० दशलक्षाहून अधिक लोक या आजाराने ग्रस्त आहेत.
भारतामध्ये विकसित शहरांच्या आकडेवारीनुसार दरवर्षी १० हजारपेक्षा जास्त मुले या आजाराने जन्माला येतात. परंतु ग्रामीण भागातील रुग्णांचा समावेश केल्यास ही संख्या दुप्पट होऊ शकते. कारण यापैकी ५० टक्के रुग्ण गरिबी आणि वैद्यकीय उपचारांच्या अभावामुळे २० व्या वर्षाच्या आत मृत्युमुखी पडतात. याविषयी अधिक माहिती देताना मुलुंड येथील प्लॅटिनम हॉस्पिटलचे हेमॅटोलॉजिस्ट डॉ. दीपकुमार महाजन सांगतात, थॅलेसेमिया हा एक रक्तविकार आहे. यामध्ये मुलांच्या शरीरातील लाल रक्तपेशींची निर्मिती योग्य पद्धतीने होत नाही.
या आजाराने ग्रस्त मुले जास्त काळ जगू शकत नाही. थॅलेसेमिया हा एक अनुवांशिक आजार आहे. आई किंवा वडील या आजाराने ग्रस्त असल्यास त्यांच्या मुलांनाही हा विकार होऊ शकतो. यामुळेच खबरदारी म्हणून विवाहापूर्वी या आजाराशी संबंधित वैद्यकीय तपासणी करून घेणे आवश्यक आहे. जेणेकरून भविष्यातील धोके टाळले जातील. आईवडिलांमध्ये या आजाराची सौम्य लक्षणे असली तरीही मुलांना थॅलेसेमिया होण्याची शक्यता अधिक असते.
अवेर, शेयर व केयर ही आंतरराष्ट्रीय थॅलेसेमिया दिनाची या वर्षांची थीम आहे. म्हणजेच या आजाराबाबत सावध व्हा. महिती शेअर करा व काळजी घ्या अशी असून थॅलेसेमिया या आजाराच्या जागतिक प्रभावाविषयी जागरूकता वाढवण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. रक्तचाचण्यांमुळे जोडप्यांना थॅलेसेमिया किंवा इतर अनुवांशिक विकारांनी मुल होण्याचे धोके ओळखण्यात मदत होऊ शकते.
डॉ. राणी खेडीकर: अध्यक्ष बाल कल्याण समिती, पुणे आज फेसबुकवर एक खूप वायरल झालेली पोस्ट…
रवींद्र मुळे: अहिल्या नगर काश्मीरमधील पहलगाम येथील क्रूर आणि भ्याड हत्याकांडाने सगळा देश हादरून गेला…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण द्वादशी शके १९४७ . चंद्र नक्षत्र पूर्वा भाद्रपदा योग ऐद्र.…
काश्मीरमधील पहलगाम येथील बैसरनमध्ये दहशतवाद्यांनी भारतीय पर्यटकांवर केलेल्या हल्ल्याने भारताच्या सर्वोच्च स्थानी असलेल्या जम्मूपासून ते…
बंगलोर: इंडियन प्रीमियर लीगच्या ४२व्या सामन्यात आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने राजस्थान रॉयल्सला ११ धावांनी हरवले…
नैना प्रकल्पाची गतीने अंमलबजावणी करावी मुंबई : भविष्यातील आव्हाने लक्षात घेता पर्यावरण पूरक आणि समृद्ध…