श्रीभालचंद्र महाराजांच्या दर्शनाला दररोज महाराष्ट्राच्या कोनाकोपऱ्यातून उदाहणार्थ वारुळातील मुंग्यांच्या जशा रांगा एकमेकांमागून एक अशा सतत चालत असतात तशी भाविकांची ये-जा त्यांच्या निवासस्थानाकडे नित्य चालू असे. त्यात कोणी मंत्री, कोणी शिक्षक व्यथेने पीडित झालेला असे, दीनदुबळा असे, कोणाला पैसा, तर कोणाला पदवी हवी असे, ऐश्वर्य हवे असे. कोणाला नोकरी हवी असे, तर कोणाची व्याधी दूर करायची असे. असे अनेक भक्तांचे अनेक हेतू असत.
श्रीभालचंद्रबाबा हे जणू सूर्य होते. कारण सूर्याचा प्रकाश जसा किडा, मुंगीपासून ते शेतकऱ्यापर्यंत सर्वांना सारखाच भासतो तसाच बाबांचा समान धर्म होता. सर्वांना श्रीबाबांचे दर्शन सारखेच घडे. राजापासून ते शेतकऱ्यापर्यंत. श्रीबाबांसमोर सर्वांना साध्या जमिनीवर बसावे लागे. तिथे गाद्या नव्हत्या, विभूती नव्हती, माळा नव्हत्या, तंत्र नव्हते, मंत्र नव्हते.
श्रीबाबा कुठेतरी एका कोपऱ्यात ध्यानस्थ बसलेले असत. त्यांना कोणी हार घातला, तर ते लहरीत असले तरच स्विकार करीत. नाहीपेक्षा वरच्यावर फेकून देत. कारण त्यांना हार, तुरे, परिमळ, दिवाबत्ती काही नको होती. ते सर्वांच्या पुढे होते. धरणी ज्यांचे आसन असून वायू त्यांचे अन्न होते किंबहुना हे विश्व ज्याचे घर होते आणि आकाश हे वस्त्र परिधान केले होते. त्याला या जगात हवे काय आणि नको काय? ते अमृताचे सागर होते! त्यांना कोणताच दुजाभाव माहीत नव्हता. समानता हाच त्यांचा स्थायीभाव होता.
(क्रमश:)
– राजाधिराज श्री भालचंद्र
मुंबई : पहलगाममध्ये धर्म विचारून पर्यटकांवर गोळ्या झाडल्या, २६ निष्पापांचा बळी गेला, त्यात महाराष्ट्राच्या ६…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) देशभरात त्याविरुद्ध संताप व्यक्त…
नवी दिल्ली : पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी हल्ला केला होता. या…
मुंबई: दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडाने नुकताच विकी कौशलचा 'छावा' हा चित्रपट पाहिला. हा चित्रपट पाहिल्यानंतर…
नवी दिल्ली : पाकिस्तानने जिहादची एक नवी पद्धत वापरण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तानी महिला भारतात…
मुंबई: प्रसिद्ध पॉडकास्टर आणि युट्यूबर रणवीर अल्लाहबादियाला सर्वोच्च न्यायालया (Supreme Court) कडून मोठा दिलासा मिळाला…