मुंबई (प्रतिनिधी) : वर्ल्ड ट्रेड सेंटर, मुंबई येथे ‘महाराष्ट्र एमएसएमई एक्सपो २०२२’ या तीनदिवसीय व्यावसायिक प्रदर्शनाची मंगळवारी दिमाखदार सोहळ्याने सांगता झाली. समारोप सोहळ्यास वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या कार्यकारी संचालिका रूपा नाईक, झेप उद्योगिनीच्या संस्थापिका पूर्णिमा शिरीषकर आदी मान्यवर उपस्थित होते. सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्रालय आणि सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग विकास संस्था, “झेप उद्योगिनी” आणि “वी एमएसएमई” च्या सहकार्याने १ मे ते ३ मे दरम्यान हे प्रदर्शन आयोजित केले गेले.
१ मे महाराष्ट्रदिनी केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी या प्रदर्शनाचे उद्घाटन केले. उद्योजक व्हा, रोजगार निर्माण करा असे आवाहन त्यांनी केले. केंद्र सरकार हे महिला उद्योजकांनी तयार केलेल्या उत्पादनांचे मार्केटिंग करणार असल्याची माहिती एमएसएमई महाराष्ट्रचे संचालक प्रशांत पार्लेवार यांनी दिली. वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या कार्यकारी संचालिका रूपा नाईक यांनी महिला सक्षमीकरणावर भर देताना एमएसएमई विभागाने त्यांच्या विविध समित्यांवर महिला उद्योजिका सदस्यांची नियुक्ती करावी, अशी विनंती उद्योगमंत्र्यांना केली.
हभप शामसुंदर सोन्नर महाराज यांच्या पंढरीच्या वारीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी शाहीर अमर शेख यांचे नातू निशांत जैनू शेख यांनी महाराष्ट्राचा पवाडा सादर केला. दुसऱ्या दिवशीच्या सत्रात लघू-मध्यम उद्योग क्षेत्रातील व्यावसायिक संधी एमएसएमई विभागाच्या अधिकाऱ्यांनी विस्तृतपणे मांडल्या. तिसऱ्या दिवशीच्या सत्रात अपेडा या वाणिज्य मंत्रालयाच्या विभागाने शेती आणि अन्नप्रक्रिया या संदर्भातील निर्यातीच्या संधी यावर प्रकाशझोत टाकला.
झेप उद्योगिनीच्या संस्थापिका पूर्णिमा शिरीषकर यांनी यावेळी एमएसएमई महाराष्ट्र विभागाचे आभार मानले. सोबतच या प्रदर्शनात महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांतून उद्योजक सहभागी झाले होते. त्यांचे देखील आभार शिरीषकर यांनी मांडले. भविष्यात देखील महाराष्ट्राच्या विविध भागांत अशा प्रकारे एमएसएमई एक्स्पो भरविण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
पहलगाम हल्ल्यानंतर 'फौजी' ची अभिनेत्री इमानवी इस्माईलला विरोध Prabhas Actress Imanvi Esmail: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण…
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात उष्णता प्रचंड वाढत (Heat Wave) चालली आहे. एप्रिल महिन्यात…
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर भारतात सुरू असलेल्या राजकीय…
कोलकाता : पहलगाममध्ये मंगळवारी(दि.२२) झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जूनमध्ये भारतात होणारी दक्षिण आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धा अनिश्चित…
मुंबई : पहलगाम हल्ल्यामुळे (Pahalgam Terror Attack) संपूर्ण देशभरात एकच खळबळ उडाली असून संतापाची लाट…
जम्मू काश्मीरला फिरायला गेलेल्या एका कुटुंबासाठी खारट फ्राइड राईस जीवदान ठरले मुंबई: पहलगामच्या बैसारण येथे…