Friday, April 25, 2025
Homeदेशभारतात १८ लाखांहून जास्त व्हॉट्सअॅप अकाऊंट्स बॅन

भारतात १८ लाखांहून जास्त व्हॉट्सअॅप अकाऊंट्स बॅन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : व्हॉट्सअॅप कंपनीने भारतात १८ लाखांहून अधिक अकाऊंट्सना बॅन केले आहे. ही माहिती देताना कंपनीने सांगितले की, नवीन आयटी नियमांनुसार या अकाऊंट्सवर कारवाई करण्यात आली आहे. मार्चमध्ये ५९७ तक्रारी मिळाल्या होत्या. ज्यात ७४ अकाऊंट्सविरोधात कारवाई करण्यात आली होती, अशी माहिती व्हॉट्सॲपकडून देण्यात आली. भारतात एकाचवेळी १८ लाखांहून जास्त अकाऊंट बॅन करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

यूजर्संनी अवैध, अश्लील, मानहानी, धमकी देणारे, धमकावणारे, समाजात तेढ निर्माण करणारा मजकूर किंवा पोर्न क्लिप शेअर करणे, असे अकाऊंटवर होत असेल, तर ते अकाऊंट बॅन केले जाऊ शकते. व्हॉट्सअॅपच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, नवीन आयटी नियम २०२१च्या माहितीनुसार, आम्ही मार्च २०२२ या महिन्यातील आपला अहवाल पब्लिश केला आहे.

या रिपोर्टमध्ये व्हॉट्सअॅपने याची माहिती दिली आहे. आम्हाला किती तक्रारी मिळाल्या व त्यानंतर आम्ही किती लोकांवर कारवाई केली यासंबंधी प्रवक्त्याने माहिती दिली आहे. मार्च महिन्यात १८ लाख ५ हजार व्हॉट्सअॅप अकाऊंट्स बॅन करण्यात आले आहेत. अपशब्द, शिवीगाळ यांसारखा व्यवहार करणाऱ्या अकाऊंट्सवर कंपनीने कारवाई केली आहे. अॅपमध्ये दिलेल्या रिपोर्ट फीचर्सद्वारे यूजर्सविरोधात निगेटिव्ह फीडबॅकच्या अकाऊंटलासुद्धा बॅन करण्यात आले आहे.

कंपनीच्या म्हणण्यानुसार, गेल्या काही वर्षांपासून कंपनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सायन्स अँड एक्सपर्ट्स आदीत गुंतवणूक करीत आहे. कारण यूजर्ससाठी प्लॅटफॉर्म सुरक्षित राहावा. या वर्षी फेब्रुवारी २०२२ मध्ये व्हॉट्सअॅपने कारवाई करताना १४.२६ लाख अकाऊंट्सला बॅन केले होते.

व्हॉट्सअॅप वापरणाऱ्यांनी काही चुकांपासून दूर राहायला हवे. अॅपचा वापर स्पॅमसाठी करू नका. व्हॉट्सअॅपवर फेक न्यूज पसरवल्यास अकाऊंट बॅन होऊ शकते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -