Wednesday, July 9, 2025

आयपीएलची फायनल नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये

आयपीएलची फायनल नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये

मुंबई (वृत्तसंस्था) : आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील निम्म्यापेक्षा अधिक सामने खेळले गेले असून स्पर्धेची रंगतही दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान आयपीएलचा अंतिम सामना कुठे होणार? याची प्रतिक्षा आता संपलेली आहे. स्पर्धेचा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी याबाबत माहिती दिली.


आतापर्यंत ७० लीग सामन्यांपैकी ४७ सामने झाले असून १० पैकी ४ संघ पुढील फेरीत पोहोचणार आहेत. त्यानंतर आता प्लेऑफचे सामने आणि अंतिम सामना कुठे होणार? हे बीसीसीआयकडून स्पष्ट करण्यात आले आहे. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी याबाबत माहिती दिली असून प्लेऑफचे सामने कोलकाता आणि अहमदाबाद या ठिकाणी होणार असून अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार असल्याचे त्यांनी सांगितले.


भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने दिलेल्या माहितीनुसार अंतिम सामना २९ मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे. तर क्वॉलीफायर २ सामनाही येथेच २७ मे रोजी होईल. तर कोलकात्याच्या ईडन गार्डन्स येथे क्वॉलीफायर १ आणि एलिमिनेटर सामना अनुक्रमे २४ आणि २५ मे रोजी पार पडेल.

Comments
Add Comment