Tuesday, June 24, 2025

डोंबिवली एमआयडीसीतील कंपनीत भीषण आग

डोंबिवली एमआयडीसीतील कंपनीत भीषण आग

डोंबिवली : डोंबिवली एमआयडीसीचे फेज २ मधील एचपी वर्क्स या कंपनीला मध्यरात्री भीषण आग लागण्याची घटना घडली. सुदैवाने त्यात कोणतीही जिवितहानी झालेली नाही. मात्र कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे. कंपनीला आग कशामुळे लागली हे अद्याप समजू शकलेले नाही.


डोंबिवली एमआयडीसी अभिनव शाळेजवळ, एम.आय.डी.सी. फेज क्रमांक-२, एच.पी. वर्क्स कंपनीत आग लागली होती. या कंपनीत अँटीजन टेस्टकरिता वापरण्यात येणाऱ्या सामानाचा साठा होता. घटनास्थळी कल्याण-डोंबिवली एम.आय.डी.सी. अग्निशमन दलाचे जवान, अग्निशमन दलाचे वाहन व दोन टँकरच्या सहाय्याने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.


दुसऱ्या दिवशी अग्निशमन दलाच्या जवानांना सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवण्यास यश आले.

Comments
Add Comment