आता रस्त्यावर कोणीही नमाज पठण करत नाही
लखनऊ : महाराष्ट्रात मशिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी मनसेने आंदोलन सुरु केले आहे. दुसरीकडे उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने १ लाख लाऊड स्पीकर उतरवले आहेत. स्वत: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यात कोणत्याही वादाशिवाय शांततेत लाऊडस्पीकर उतरवल्याची माहिती दिली.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आमच्या सरकारने या प्रकरणाला योग्यपणे हाताळल्याचे म्हटले आहे. आमच्या राज्यातील वेगवेगळ्या धार्मिक ठिकाणांवरील १ लाख लाऊड स्पीकर्स उतरवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. एवढ्या मोठ्या संख्येने लाऊड स्पीकर्स उतरवल्याने राज्यातील गोंगाट कमी झाल्याचे ते म्हणाले. लाऊड स्पीकर उतरवण्यासंदर्भात आतापर्यंत कोणताही वाद झाला नसल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.
आम्ही फक्त लाऊड स्पीकर नाही तर रस्त्यावर होणाऱ्या नमाज बद्दल देखील योग्य प्रकारे मार्ग काढला आहे. आम्ही रस्त्यावर नमाज पठण करता येणार नाही अशा सूचना दिल्या होत्या आता रस्त्यावर कोणीही नमाज पठण करत नाही, असं योगी आदित्यनाथ म्हणाले. उत्तर प्रदेशात २५ कोटी मुस्लीम वास्तव्यास आहेत. मात्र, रमजान ईदला कुठेही रस्त्यावर नमाज पठण झाल्याच समोर आलेले नाही, असे योगी आदित्यनाथ म्हणाले.