राज ठाकरेंना अटक झाली तर मनसैनिक रस्त्यावर उतरेल

मुंबई : औरंगाबादमधील सभेला ज्या अटी आणि शर्थी घातल्या होत्या तेव्हाच कळाले होते की हे सर्व गुन्हा दाखल करुन अटक करण्याचा डाव सुरू आहे. पण राज ठाकरे आजही आपल्या भूमिकेवर ठाम आहेत आणि महाराष्ट्र सैनिक साहेबांच्या आदेशांचे पालन करेल. जर राज ठाकरेंना अटक झाली तर मनसैनिक रस्त्यावर उतरेल, सरकारने तयार राहावे असा इशारा मनसे नेते संदीप देशपांडे यांनी राज्य सरकारला दिला आहे.


"जर आम्हाला असे अन्यायकारकरित्या अडकविण्याचा प्रयत्न केला जात असेल तर सरकारने तयार राहावे. राज ठाकरेंना अटक झाली तर महाराष्ट्र सैनिक रस्त्यावर उतरेल. आमच्यावर कितीही केसेस पडू द्यात आम्ही घाबरत नाही. आजही आमच्यावर अनेक केसेस आहेत. आम्ही कायदेशीर लढाई तर लढूच पण साहेबांना अटक झाली तर महाराष्ट्र सैनिक शांत बसणार नाही", असे संदीप देशपांडे म्हणाले.


मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनीही सरकारचा राज ठाकरेंना अटक करण्याचा डाव असल्याची प्रतिक्रिया दिली. राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांची पुढची प्रक्रिया त्यांना अटक करण्याचीच असेल. ज्या बाळासाहेब ठाकरेंनी मशिदीवरील भोंग्याविरोधात भूमिका घेतली. आज त्यांच्याच मुलाचे सरकार आहे आणि भोंग्यांच्या मुद्द्यावरुन राज ठाकरेंविरोधात जर असे षडयंत्र केले जाणार असेल तर हे अत्यंत दुर्दैवी आहे, असे अविनाश जाधव म्हणाले.

Comments
Add Comment

स्व. मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकणाऱ्या आरोपीला पोलिसांनी केली अटक

मुंबई: हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी स्व. मीनाताई ठाकरे यांच्या दादर येथील

'वन राणी' टॉय ट्रेन पुन्हा सुरू होणार

मुंबई: चार वर्षांच्या खंडानंतर, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील मिनी टॉय ट्रेन "वन राणी" सप्टेंबरच्या अखेरीस

फडणवीस सरकारचा विद्यार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय

मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष व तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश

मुंबई मेट्रो स्टेशनवर आता तुमचा व्यवसाय सुरू करा! काय आहे ही योजना?

मुंबई: मुंबईतील उद्योजक, स्टार्टअप्स आणि व्यावसायिकांसाठी एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. महा मुंबई मेट्रोने (MMMOCl)

नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या प्रशासकीय इमारतींसाठी लागू झाले हे बंधन

मुंबई : राज्यातील नगरपरिषदा तसेच नगरपंचायतींच्या प्रशासकीय इमारती आता शासनाने तयार केलेल्या नमुना नकाशानुसारच

पर्यटनाला चालना देण्यासाठी या ठिकाणी जॉय मिनी ट्रेन सुरू करणार

मुंबई : राज्यातील महत्त्वाच्या पर्यटनस्थळांच्या ठिकाणी पर्यटन उपक्रमांना चालना देण्यासाठी शासन प्रयत्न करत