Wednesday, July 17, 2024
Homeताज्या घडामोडीदेशभरात ईद उत्साहात

देशभरात ईद उत्साहात

नवी दिल्ली (हिं.स.) : देशभरात मंगळवारी ईदेचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. भारतात आज ईद साजरी केली जात आहे, मात्र अनेक देशांमध्ये एक दिवस आधी चंद्रदर्शन झाल्यामुळे काल ईद साजरी करण्यात आली.

भारतातील सर्व मशिदी आणि इदगाहांमध्ये आज, मंगळवारी सकाळी ईदची नमाज अदा करण्यात आली. ईद उल फित्रला मिठी ईद असेही म्हणतात. या दिवशी, मुस्लीम लोक त्यांच्या घरात शेवया आणि खीरसह अनेक उत्कृष्ट पदार्थ बनवतात.

तसेच एकमेकांची गळाभेट घेऊन ईदच्या शुभेच्छा देतात. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत आज सकाळी ऐतिहासीक जामा मशिदीत ईदची नमाज अदा करण्यात आली. यासोबतच लखनऊ, हैदराबद, पटना, कानपूर, मुंबई, बंगळुरू, अमरावती, श्रीनगर इत्यादी शहरांमध्ये ईदेचा उत्साह दिसून आला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -