विनाशेड मासळी बाजारामुळे ऑनलाइन ऑर्डरला पसंती

मुंबई (प्रतिनिधी) : भारतात उष्णतेची लाट ही सामान्य बाब आहे. दर वर्षी मार्च -जूनदरम्यान भारतात तापमानवाढ दिसून येते; परंतु या वर्षी मार्च महिन्यापासूनच उन्हाच्या झळा बसण्यास सुरू झाल्या आहेत. यंदाचा एप्रिल महिना उन्हाच्या बाबतीत विक्रमी ठरला. गेल्या १२२ वर्षांमधील तापमानाचा उच्चांक यंदाच्या वर्षी देशाने गाठला. अजून एक ते दीड महिना आपल्याला पावसाची प्रतीक्षा करावयाची आहे. यातच अशा उन्हामध्ये जर बाहेर जायचे झाले, तर आजारपण आणि मग हॉस्पिटलचा अतिरिक्त खर्च या समस्या अनेक नागरिकांना येतात.


सध्याच्या वाढत्या तापमानामुळे मांसाहारी खवय्यांनी आता ऑनलाइन ऑर्डरला पसंती देत असल्याचे यमीलि या कंपनीतर्फे सांगण्यात आले आहे. वाढलेल्या तापमानामुळे ताजे मासे बाजारात जाऊन आणणे हे सध्यातरी फारच जिकरीचे झाले आहे. कारण, मुंबई व लगतच्या शहरांमध्ये अनेक ठिकाणी मासळी बाजार हा विनाशेडचा असतो त्यामुळे उन्हामध्ये उभे राहावे लागते व याचा त्रास अनेक नागरिकांना होतो. याविषयी अधिक माहिती देताना ताजे मासे, मटण, चिकन घरपोच डिलिव्हरी करणाऱ्या यमीलि कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद बांदेकर सांगतात, "एप्रिल महिन्यामध्ये आमच्या विक्रीमध्ये खासकरून ताज्या माशांच्या विक्रीत कमालीची वाढ झाली आहे.


मासे खरेदी करणे हि एक कला आहे; परंतु वाढत्या तापमानामुळे अनेक नागरिक बाहेर पडत नाहीत. कारण, उन्हामुळे विविध आजारांची लागण होण्याची शक्यता असते व यासाठीच आम्ही बाजारात मिळणाऱ्या किमतीमध्येच मुंबई, नवी मुंबई ठाणे येथे ताजे मासे, अंडी, चिकन, मटण याची घरपोच डिलिव्हरी करतो. आमच्याकडील मासे तसेच चिकन मटण हे फ्रोझन नसतात, तर ते त्याच दिवशी सकाळी बाजारातून आणले जातात तसेच आमच्याकडे असलेल्या स्टाफद्वारे ते स्वच्छ करून कापले जातात व ग्राहकांकडे पोहोचविले जातात.


सध्याचे तापमान पाहता नागरिकांनी घराच्या बाहेर पडू नये, अशी विनंती शासनातर्फे करण्यात येत आहे. लॉकडाऊनमध्ये नागरिकांच्या सुविधांसाठी सुरु केलेल्या या व्यवसायाला वाढलेल्या तापमानामुळे एक चांगली दिशा मिळाली आहे. उन्हामुळे दिवसाचे अघोषित लॉकडाउन सुरू झाले आहे, विशेषकरून ज्येष्ठ नागरिक, मधुमेह व उच्च रक्तदाब असलेल्या नागरिकांना या वाढत्या तापमानाचा खूप त्रास होतो म्हणूनच अनेक नागरिक ऑनलाइन मासे मागवत आहेत."


आज संपूर्ण भारतात ऑनलाइन फूडची मागणी दिवसागणिक वाढत चालली आहे. वर्क फ्रॉम होम तसेच कोरोना महामारीनंतर वाढलेल्या कामाच्या वाढलेल्या "एक्सट्रा हवर्स"मुळे अनेकांना इच्छा असूनही मासे - चिकन आणण्यास वेळ मिळत नाही, अशा कुटुंबासाठी यमीलि घरपोच डिलिव्हरी करीत आहेत.

Comments
Add Comment

ब्रँड विरुद्ध ब्रँडी: फडणवीस-ठाकरे गटात शाब्दिक युद्ध, राजकारण तापले!

मुंबई: बेस्ट (BEST) निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात 'ब्रँड' विरुद्ध 'ब्रँडी' असा नवा वाद सुरू झाला आहे.

मेट्रोमुळे टॅक्सी आणि रिक्षा चालक धास्तावले!

'मेट्रो लाइन ३' दक्षिण मुंबईतील प्रवासात क्रांती घडवेल मुंबई: दक्षिण मुंबईत सध्या विकसित होत असलेली 'मेट्रो लाइन

मुंबई भाजपची डबेवाल्यांसाठी नेत्र तपासणी शिबिर, 'आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपचा' उपक्रमाची सुरुवात

पुढील दिवसांत भाजप कार्यकर्ते घरोघरी जाऊन मुंबईकरांचे अभिप्राय आणि मते जाणून घेतील - अमीत साटम मुंबई :

नवरात्रीमध्ये करा या खास मार्केटमधून शॉपिंग , गरबा खेळताना उठून दिसाल

नवरात्रीमध्ये करा या खास मार्केटमधून शॉपिंग , गरबा खेळताना उठून दिसाल गणेशोत्सव झाला कि वेध लागतात नवरात्रीचे.

दिवाळीनंतर तीन टप्प्यात होणार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ?

मुंबई : महाराष्ट्रात दिवाळीनंतर तीन टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील. राज्य निवडणूक आयोग

वांद्र्यातील स्कायवॉक वर्षअखेर होणार सुरू

अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगरांकडून कामांची पाहणी मुंबई (खास प्रतिनिधी): वांद्रे रेल्वे स्थानक ते महाराष्ट्र