मुंबई : पेट्रोल, डिझेल दरवाढ आणि महागाईने आधीच सर्वसामान्यांचे कंबरडे मोडलेले असताना आता पुन्हा एकदा सीएनजी गॅसच्या दरात वाढ झाली आहे. महानगर गॅस लिमिटेडने प्रति किलो मागे ४ रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे आता मुंबई आणि परिसरात सीएनजी गॅसच्या प्रति किलोसाठी ७६ रुपये मोजावे लागणार आहेत. महानगर गॅस लिमिटेड हा मुंबई, ठाणे आणि परिसरात प्रमुख गॅस वितरक आहे. ही दरवाढ आज पहाटेपासून लागू झाली आहे.
केंद्र सरकारने एक एप्रिलपासून नैसर्गिक वायूच्या किंमतीत ११० टक्के वाढ केली. त्यामुळे महानगर गॅसला गॅस खरेदीसाठी अधिक खर्च करावा लागत आहे. त्यामुळे कंपनीकडून खरेदी आणि विक्री खर्चातील ताळमेळ साधण्यासाठी टप्प्याटप्याने दरवाढ केली जात आहे.
दरम्यान, घरगुती ग्राहकांना महानगर गॅसने दिलासा दिला आहे. घरगुती वापरासाठी असलेल्या पीएनजी गॅसच्या दरात कोणतीही दरवाढ केली नाही.
महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडनेही सीएनजीच्या दरात वाढ केली. 26 एप्रिल रोजी झालेल्या दरवाढीनंतर नाशिकमध्ये आता सीएनजीचे दर प्रति किलो 80 रुपये झाले आहेत. नाशिकमध्ये एकाच महिन्यात सीएनजीचा दर 65.25 रुपयांवरून 80 रुपये झाला आहे. नाशिकमध्ये सीएनजीचा दर 1 एप्रिल 2022 रोजी 65.25 रुपये किलो होता. त्यानंतर 6 एप्रिल रोजी झालेल्या दरवाढीनंतर हा दर 71 रुपयांवर पोहचला. त्यानंतर 13 एप्रिल, 20 एप्रिल आणि 26 एप्रिल रोजी दरवाढ करण्यात आली.
आजही पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीबाबत दिलासा मिळाला आहे. तेल कंपन्यांनी इंधनाच्या दरात कोणतीही वाढ केलेली नाही. मुंबईत पेट्रोलचा दर 120.51 रुपये प्रतिलिटर आणि डिझेलचा दर 104.77 रुपये प्रतिलिटर इतका आहे.
माझे कोकण: संतोष वायंगणकर गरिबी आहे, घरची परिस्थिती नाही यामुळे पुढे शिक्षण घेता येत नाही…
वैशाली शिरोडकर: पहलगाम निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेला काश्मीरचा भाग दहशतीच्या सावटाखालीही फुलतो आहे. गेल्या चार-पाच…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण वरुथिनि एकादशी, शके १९४७. शततारका नक्षत्र. योग ब्रम्हा. चंद्र राशी…
भारताचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी दहशवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर हल्ला करून २८ जणांची…
हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ४१व्या सामन्यात आज २३ एप्रिलला मुंबई इंडियन्स संघाने सनरायजर्स हैदराबादला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली…